Home / लेख / ChatGPT vs Perplexity vs Gemini vs Grok: कोणते AI मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट? किती आहे सबस्क्रिप्शन शुल्क? वाचा

ChatGPT vs Perplexity vs Gemini vs Grok: कोणते AI मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट? किती आहे सबस्क्रिप्शन शुल्क? वाचा

ChatGPT vs Perplexity vs Gemini vs Grok: कोणते AI मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट? किती आहे सबस्क्रिप्शन शुल्क? वाचा

ChatGPT vs Gemini: सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने आपल्या कामाची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे. ईमेल लिहिण्यापासून ते कोड तयार करण्यापर्यंत, व्हिडिओ बनवण्यापासून ते सखोल संशोधन करण्यापर्यंत, एआय टूल्स आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.

भारतात एआयची शर्यत सध्या खूप तीव्र झाली आहे. ChatGPT, Google Gemini, xAI चे Grok आणि Perplexity यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी प्रत्येकासाठी परवडणाऱ्या किमतीत आकर्षक प्लॅन आणले आहेत. त्यामुळे तुमच्या गरजांनुसार कोणता प्लॅन निवडायचा हे ठरवणे थोडे कठीण आहे. चला, या प्रमुख एआय मॉडेल्सची तुलना करूया.

Perplexity Pro

Perplexity ने स्वतःला एका ‘सर्च-फोकस्ड एआय’ म्हणून स्थापित केले आहे, जे थेट उत्तरे आणि रिअल-टाइम माहिती देते. याचा प्रो प्लॅन दरमहा सुमारे 1,999 रुपये (किंवा वार्षिक 16,500 रुपये) आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एअरटेल ग्राहकांना Airtel Thanks ॲपद्वारे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते, ज्याची किंमत 17,000 रुपये आहे.

या प्लॅनमध्ये एकाच वेळी अनेक एआय मॉडेल्सला ॲक्सेस मिळतो, ज्यात GPT-5, Claude 4, Grok 4 आणि Gemini 2.5 Pro यांचा समावेश आहे. हे एक विश्वसनीय रिसर्च इंजिन म्हणून काम करते, जे तुमच्या सर्व जुन्या सर्चचा रेकॉर्ड ठेवते.

Google Gemini Pro

गुगलनेही आपल्या एआय मॉडेलला दमदार बनवले आहे. त्याचा Gemini Pro प्लॅन दरमहा 1,950 रुपये आहे. हा प्लॅन गुगलच्या सर्वात प्रगत मॉडेल Gemini 2.5 Pro ला ॲक्सेस देतो. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे Gmail, Docs आणि Meet सारख्या गुगल ॲप्ससोबत याचे उत्तम इंटिग्रेशन आहे.

उदाहरणार्थ, जीमेलमध्ये ईमेल लिहिणे, डॉक्समध्ये अहवाल तयार करणे आणि मीटमध्ये व्हिडिओ कॉल सुधारणे अशी कामे ते सहज करते. यासोबतच यात 2 TB गुगल ड्राईव्ह स्टोरेजही मिळते.

xAI’s SuperGrok

एलन मस्कची एआय स्टार्टअप xAI भारतात खूप वेगाने वाढतेय. त्यांचा SuperGrok प्लॅन केवळ 700 रुपये प्रति महिना आहे. अमेरिकेत ($30) असलेल्या किमतीच्या तुलनेत हा प्लॅन खूप स्वस्त आहे. हा विद्यार्थ्यांसाठी, कोडर्ससाठी आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी योग्य आहे. यात Grok 3 आणि Grok 4 मॉडेलला ॲक्सेस मिळतो.

हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, कोडिंग आणि क्रिएटिव्ह कामांसाठी उपयुक्त आहे. या प्लॅनमध्ये इमेज आणि व्हिडिओ जनरेशनची सुविधाही मिळते, ज्यात दररोज 100 व्हिडिओ बनवता येतात.

ChatGPT: गो, प्लस आणि प्रो

OpenAI ने भारतीयांसाठी तीन वेगवेगळे प्लॅन आणले आहेत. यात सर्वात स्वस्त प्लॅन ChatGPT Go आहे, ज्याची किंमत 399 रुपये प्रति महिना आहे. हा एक खास भारतीय प्लॅन आहे, जो GPT-5 या सर्वात प्रगत एआय मॉडेलला ॲक्सेस देतो. याशिवाय ChatGPT Plus (1,999 रुपये प्रति महिना) आणि ChatGPT Pro (19,900 रुपये प्रति महिना) हे प्लॅनही उपलब्ध आहेत, जे व्यावसायिक आणि मोठ्या कंपन्यांसाठी आहेत. OpenAI ने कमी किमतीत एआय उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

‘Trump is dead’ ट्रेंडमुळे सोशल मीडियावर खळबळ, ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा कशी पसरली? जाणून घ्या

नागपूरमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीची हत्या

बीडमध्ये कंटेनरने भाविकांना चिरडले ! सहा जणांचा मृत्यू