Home / लेख / तंत्रज्ञानाची कमाल! आता चक्क रोबोट देणार बाळाला जन्म; चीनमधील प्रयोग चर्चेत

तंत्रज्ञानाची कमाल! आता चक्क रोबोट देणार बाळाला जन्म; चीनमधील प्रयोग चर्चेत

China Pregnancy Robot

China Pregnancy Robot: बाळाला जन्म देण्यासाठी एका महिलेची गरज असते. पण जर भविष्यात तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली की, माणूस नाही तर एक रोबोट बाळाला जन्म देऊ लागला, तर? ही कल्पना आता सत्यात उतरण्याच्या मार्गावर आहे.

चीनी शास्त्रज्ञ जगातील पहिला ‘गर्भधारणा रोबोट’ (China Pregnancy Robot) विकसित करत आहेत, जो एखाद्या सजीव बाळाला जन्म देऊ शकतो. रिपोर्टनुसार , शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की हे तंत्रज्ञान गर्भाधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत पूर्ण गर्भधारणेची प्रक्रिया तंतोतंत जुळवून घेईल.

या तंत्रज्ञानामध्ये, गर्भाची वाढ कृत्रिम गर्भाशयात होईल आणि त्याला नळीद्वारे पोषक तत्वे मिळतील. मात्र, स्त्रीबीज आणि शुक्राणूंचे फलन कसे होईल, याबाबत शास्त्रज्ञांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही.

गुआंगझोउ-आधारित कैवा टेक्नॉलॉजी (Kaiwa Technology) ही कंपनी हा रोबोट तयार करत आहे. या टीमचे नेतृत्व सिंगापूरच्या न्यानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञ डॉ. झांग किफेंग करत आहेत.

तंत्रज्ञानाचे फायदे आणि नैतिक प्रश्न (China Pregnancy Robot)

हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास ज्या जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा शक्य नाही, त्यांना यामुळे मोठा फायदा होऊ शकतो. तसेच, ज्या स्त्रियांना गर्भधारणा करायची नाही, त्यांच्यासाठीही हा एक नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

डॉ. झांग यांनी दावा केला आहे की, हे तंत्रज्ञान आधीच प्रगया तंत्रज्ञाने आधीच प्रगती केली आहे. त्यांनी सांगितले की, “आता याला रोबोटच्या शरीरात बसवणे आवश्यक आहे, जेणेकरून एक खरी व्यक्ती आणि रोबोट यांच्यात संवाद साधला जाईल, ज्यामुळे गर्भधारणा शक्य होईल आणि गर्भाची वाढ आतमध्ये होऊ शकेल.”

या रोबोटचा प्रोटोटाइप 2026 पर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे, ज्याची अंदाजित किंमत सुमारे 14,000 अमेरिकन डॉलर्स असेल. या तंत्रज्ञानामुळे नैतिक आणि कायदेशीर प्रश्नांवरही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, हे तंत्रज्ञान सत्यात उतरल्यास प्रजनन विज्ञानातक्रांती घडवून आणेल आणि ज्यांना वंध्यत्वाची (infertility) समस्या आहे, त्यांच्यासाठी नवीन आशा निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.


हे देखील वाचा –

आशिया कपपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली; Dream11 ने स्पॉन्सरशिप सोडल्याची चर्चा; खेळाडूंच्या जर्सीवर कोणाचा लोगो दिसणार?

9 कॅरेट सोने नक्की काय आहे? किंमत-शुद्धेपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

PAN Card हरवले? आता फक्त 5 मिनिटांत घरी बसून करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रक्रिया