Clicks Communicator: जुन्या काळातील ब्लॅकबेरी फोन आणि त्यावरील फिजिकल कीबोर्डची आठवण काढणाऱ्या लोकांसाठी एक मोठी खूशखबर आहे. ‘क्लिक्स’ या ब्रँडने आपला पहिला स्मार्टफोन ‘कम्युनिकेटर’ लाँच केला असून, हा फोन पुन्हा एकदा बटणांच्या कीबोर्डचा सुवर्णकाळ परत आणण्यासाठी सज्ज झाला आहे. हा केवळ जुन्या डिझाइनचा फोन नसून, यामध्ये अनेक आधुनिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
किंमत आणि उपलब्धता
क्लिक्स कम्युनिकेटर या फोनची किंमत 499 डॉलर्स (सुमारे 45,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला हा फोन रिझर्व्ह ग्राहकांसाठी 399 डॉलर्स (सुमारे 36,000 रुपये) या विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध असेल. हा फोन केवळ मुख्य स्मार्टफोनचा पर्याय म्हणून नाही, तर एक महत्त्वाचा सोबतचा फोन (Companion Phone) म्हणून वापरण्यासाठी डिझाइन केला आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याचा बटणांचा कीबोर्ड. हा कीबोर्ड केवळ टाईपिंगसाठी नाही, तर तो टच सेन्सिटिव्ह असून त्याद्वारे तुम्ही स्क्रीन स्क्रोल देखील करू शकता.
- डिस्प्ले: यात 4.03 इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
- प्रोसेसर आणि ओएस: हा फोन मीडियाटेक 5जी प्रोसेसरवर चालतो आणि यात सर्वात नवीन ‘अँड्रॉइड 16’ ही ऑपरेटिंग सिस्टम मिळते.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि सेल्फीसाठी 24 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
- बॅटरी: या डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 4000 mAh ची बॅटरी मिळते.
आधुनिक ट्विस्ट आणि बटणे
आयफोनच्या ‘ॲक्शन बटन’प्रमाणेच या फोनमध्ये एक प्रोग्रॅमेबल साइड बटन दिले आहे, ज्याद्वारे तुम्ही हवे ते फिचर सेट करू शकता. तसेच, विमान प्रवासासाठी खास ‘एअरप्लेन मोड’चे वेगळे बटनही यात दिले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी-सी पोर्ट, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉट यांसारख्या सुविधाही मिळतात.
या फोनमध्ये ड्युअल सिम (फिजिकल आणि ई-सिम) सपोर्ट असून याचे कव्हर्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता.
हे देखील वाचा – Famous Temples in Maharashtra : एकदा महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांना भेट द्यायलाच हवी! अध्यात्म आणि ऐतिहासिक वारशाचा अनमोल ठेवा









