Home / लेख / Flipkart Big Billion Days मध्ये बंपर डील! CMF Phone 2 Pro मिळवा 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत

Flipkart Big Billion Days मध्ये बंपर डील! CMF Phone 2 Pro मिळवा 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत

CMF Phone 2 Pro: Flipkart Big Billion Days Sale 2025 मध्ये यावर्षी लाँच झालेल्या अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळत आहे....

By: Team Navakal
CMF Phone 2 Pro

CMF Phone 2 Pro: Flipkart Big Billion Days Sale 2025 मध्ये यावर्षी लाँच झालेल्या अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळत आहे. मात्र 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये एक दमदार 5G स्मार्टफोन शोधणाऱ्यांसाठी CMF Phone 2 Pro या फोनवर आतापर्यंतची सर्वात आकर्षक डील उपलब्ध झाली आहे.

या सेलमध्ये या फोनची किंमत मोठ्या प्रमाणात घटली असून बँक ऑफर्समुळे ग्राहकांना अंदाजे 4,500 रुपयांपर्यंतची बचत करता येणार आहे. 23 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या सेलमध्ये हा फोन 14,499 रुपयांच्या प्रभावी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

बँक ऑफरमुळे किंमत थेट 14,499 रुपयांवर

एप्रिल 2025 मध्ये 18,999 रुपयाच लाँच झालेल्या किमतीत बाजारात आलेला CMF Phone 2 Pro (8GB रॅम + 128GB स्टोरेज) सध्या Flipkart वर 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यावर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना 10% चा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे.

म्हणजेच, हा स्मार्टफोन बँक ऑफरनंतर थेट 14,499 रुपयांच्या प्रभावी किमतीवर येत आहे. याशिवाय, जुन्या फोनवर 12,050 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. अशाप्रकारे, लाँच किमतीपेक्षा सुमारे 4,500 रुपयांना स्वस्त मिळत असल्याने ही डील बजेट-फ्रेंडली खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे.

CMF Phone 2 Pro ची प्रमुख फीचर्स

CMF Phone 2 Pro हा केवळ किंमतीमुळे नाही, तर त्याच्या फीचर्समुळेही या रेंजमध्ये उत्कृष्ट पर्याय ठरतो. त्याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • डिस्प्ले: 6.77 इंचचा मोठा Full HD+ AMOLED डिस्प्ले जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 nits पीक ब्राइटनेससह येतो.
  • प्रोसेसर आणि OS: ऑक्टा कोर MediaTek Dimensity 7300 Pro चिपसेट, जो Nothing OS 3.2 आधारित Android 15 वर चालतो.
  • कॅमेरा सेटअप: रियरला 50MP प्रायमरी (EIS सपोर्टसह) + 50MP टेलीफोटो + 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा. तर 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.
  • बॅटरी आणि चार्जिंग: 5,000mAh ची मोठी बॅटरी, जी 33W फास्ट चार्जिंग आणि 5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
  • कनेक्टिव्हिटी: यात 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC, GPS आणि USB Type C पोर्टसह सर्व महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा – ‘तुम्ही तेही नाही करू शकणार!’: शोएब अख्तरने केली ‘ती’ चूक अन् अभिषेक बच्चनने पाकिस्तानची उडवली खिल्ली

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या