Home / लेख / सर्वात पातळ iPhone Air झाला स्वस्त! हजारो रुपयांची होईल बचत

सर्वात पातळ iPhone Air झाला स्वस्त! हजारो रुपयांची होईल बचत

Apple iPhone Air Offer : तुम्ही जर नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे खास संधी आहे. टेक...

By: Team Navakal
Apple iPhone Air Offer
Social + WhatsApp CTA

Apple iPhone Air Offer : तुम्ही जर नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे खास संधी आहे. टेक कंपनी ॲपल त्यांच्या नवीन आयफोन 17 वर बंपर डिस्काउंट देत आहे. तुम्ही आकर्षक ऑफरसह iPhone Air खरेदी करू शकता. हा या सीरिजमधील सर्वात पातळ फोन आहे.

Croma स्टोअरच्या ब्लॅक फ्रायडे विक्री दरम्यान iPhone Air वर एक आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. केवळ थेट सवलत नाही तर बँकांचे आकर्षक लाभही मिळत आहेत, ज्यामुळे या डिव्हाइसची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. जर तुम्ही नवीन डिव्हाइसमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल, तर ही डील तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

iPhone Air वरील सवलत योजना

सप्टेंबरमध्ये बाजारात आणलेल्या या फोनची मूळ किंमत ₹1,19,900 आहे. परंतु, तुम्ही हा डिव्हाइस क्रोमाच्या वेबसाइटवरून फक्त ₹1,12,900 मध्ये खरेदी करू शकता, म्हणजेच तुम्हाला थेट ₹7,000 ची सवलत मिळत आहे.

या व्यतिरिक्त कंपनी ICICI बँक, IDFC बँक आणि SBI बँक यांसारख्या बँकांच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ₹4,000 पर्यंतचा त्वरित सूट देत आहे. याचा अर्थ तुम्ही या फोनवर एकूण ₹11,000 पर्यंतची बचत करू शकता.

iPhone Air ची उत्कृष्ट वैशिष्ट्ये

iPhone Air च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.5 इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो, जो ProMotion तंत्रज्ञानाचा डिस्प्ले आहे. याचा अर्थ तुम्हाला 120 हर्ट्झचा फास्ट डिस्प्ले मिळेल. या डिव्हाइसमध्ये A19 Pro चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जो चिपसेट आतापर्यंत फक्त प्रो मॉडेलमध्ये मिळत होता.

यासोबतच, यामध्ये 2X चा ऑप्टिकल झूम कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनची जाडी फक्त 5.6 मिमी आहे, म्हणजेच हा आतापर्यंतचा सर्वात बारीक iPhone आहे आणि त्याचे वजन केवळ 156 ग्रॅम आहे.

हे देखील वाचा – फक्त 5 हजार रुपये भरा आणि घरी घेऊन जा Hero Splendor; मायलेज 70 किमी; पाहा बंपर ऑफर

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या