Home / लेख / तुमच्या नावावरील SIM Card दुसरे कोणीतरी वापरत आहे? नियमांचे उल्लंघन केल्यास होईल मोठी शिक्षा

तुमच्या नावावरील SIM Card दुसरे कोणीतरी वापरत आहे? नियमांचे उल्लंघन केल्यास होईल मोठी शिक्षा

SIM Card Misuse Warning : दूरसंचार मंत्रालयाच्या (Department of Telecommunications) वतीने मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला जारी करण्यात आला...

By: Team Navakal
SIM Card Misuse Warning
Social + WhatsApp CTA

SIM Card Misuse Warning : दूरसंचार मंत्रालयाच्या (Department of Telecommunications) वतीने मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला जारी करण्यात आला आहे. सायबर फसवणूक किंवा इतर कोणत्याही अवैध कारवायांसाठी तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या सिम कार्डचा वापर झाल्यास त्या सिम कार्डच्या नोंदणीकृत धारकाला थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा स्पष्ट इशारा DoT ने दिला आहे.

याव्यतिरिक्त, मोबाईलचा ओळख क्रमांक असलेल्या IMEI नंबर (International Mobile Equipment Identity) मध्ये फेरफार करणाऱ्या कोणत्याही ॲप्लिकेशन्स किंवा उपकरणांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

तुमचे सिम कार्ड वापरताना ही सावधगिरी बाळगा

DoT ने नागरिकांना मोबाईल उपकरणे आणि सेवा वापरताना खालील 4 धोक्याच्या गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे:

  1. IMEI फेरफार केलेले डिव्हाईस: ज्या मोबाईल किंवा उपकरणांचे IMEI क्रमांक जाणूनबुजून बदलले आहेत किंवा त्यात छेडछाड केली आहे, त्यांचा वापर पूर्णपणे टाळा.
  2. फसवणुकीने सिम कार्ड खरेदी: चुकीची कागदपत्रे, बनावट ओळख किंवा अन्य कोणत्याही फसव्या पद्धतीने सिम कार्ड मिळवणे हा गंभीर गुन्हा आहे.
  3. बदलणारे IMEI असलेले उपकरणे: मोडेम, मॉड्यूल्स किंवा सिम बॉक्सेस (SIM Boxes) सारखी अशी उपकरणे वापरणे, जे IMEI क्रमांक बदलण्याची सोय देतात.
  4. सिम कार्ड दुसऱ्याला देणे: तुमच्या नावावर दिलेले सिम कार्ड दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यासाठी देऊ नका. कारण, त्या सिम कार्डचा गैरकृत्यांसाठी वापर झाल्यास, कायद्यानुसार प्राथमिक जबाबदारी नोंदणीकृत ग्राहकाचीच राहील.

DoT ने नमूद केले आहे की, “IMEI बदलणे, फसव्या मार्गाने सिम कार्ड मिळवणे, किंवा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीकडे आपले सिम कार्ड सोपवणे यासारख्या कृतींमुळे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात. तुमच्या नावावरील सिम कार्डचा उपयोग अवैध कामांसाठी झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी मूळ ग्राहकावरच येईल.”

नियम मोडल्यास 50 लाख दंड आणि तुरुंगवास

IMEI सारख्या दूरसंचार ओळख क्रमांकामध्ये फेरफार केल्यास कठोर कायद्याचा सामना करावा लागू शकतो. दूरसंचार कायदा, 2023 मध्ये ओळखपत्रांशी छेडछाड करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.

  • शिक्षेचे स्वरूप: नियमांचे उल्लंघन केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, 50 लाख रुपयांपर्यंत आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
  • सायबर सुरक्षा नियम: दूरसंचार (Telecom Cyber Security) नियम, 2024 नुसार IMEI क्रमांक बदलणे, किंवा असे बदल करता येतील अशी उपकरणे तयार करणे, वापरणे किंवा ताब्यात ठेवण्यास पूर्णपणे बंदी आहे.

‘संचार साथी’ वापरून डिव्हाईस तपासा

नागरिकांनी स्वतःचे संरक्षण करावे यासाठी DoT ने संचार साथी (Sanchar Saathi) पोर्टल किंवा मोबाईल ॲप वापरण्याची शिफारस केली आहे. या डिजिटल साधनांच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या उपकरणाचा ब्रँड, मॉडेल आणि उत्पादक कंपनी याबद्दलची माहिती तपासू शकतात. यामुळे त्यांचे उपकरण बनावट नाही आणि त्यात कोणताही फेरफार झालेला नाही याची खात्री करता येते.

हे देखील वाचा – Ladki Bahin Yojana : ‘देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत…’; लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांचे महत्त्वाचे वक्तव्य

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या