Home / लेख / आता मुलांसाठी येणार ‘Baby Grok’, या AI चॅटबॉटमध्ये काय असेल खास? जाणून घ्या

आता मुलांसाठी येणार ‘Baby Grok’, या AI चॅटबॉटमध्ये काय असेल खास? जाणून घ्या

Baby Grok Ai | सध्या एआय चॅटबॉटचा वापर प्रचंड वाढला आहे. चॅटजीपीटी, ग्रोक, जेमिनी असे अनेक एआय चॅटबॉट उपलब्ध आहेत....

By: Team Navakal
Baby Grok Ai

Baby Grok Ai | सध्या एआय चॅटबॉटचा वापर प्रचंड वाढला आहे. चॅटजीपीटी, ग्रोक, जेमिनी असे अनेक एआय चॅटबॉट उपलब्ध आहेत. पण केवळ लहान मुलांसाठी आतापर्यंत एआय चॅटबॉट (Ai Chatbot) उपलब्ध नव्हते. मात्र, आता अब्जाधीश इलॉन मस्क मुलांसाठी खास बेबी ग्रो एआय (Baby Grok Ai) आणणार आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यांची कंपनी एक्सएआय आता मुलांसाठी खास ‘बेबी ग्रोक’ ॲप लाँच करणार आहे.

काय आहे ‘बेबी ग्रोक’?

‘बेबी ग्रोक’ हे मस्कच्या सध्याच्या ग्रोक चॅटबॉटचेच मुलांसाठी अनुकूल असे एक नवीन रूप असू शकते. हे ॲप मुलांना सुरक्षित, शैक्षणिक आणि मनोरंजक एआय अनुभव देण्यासाठी तयार करण्यात येत आहे. या ॲपमध्ये मुलांच्या भाषा, आकलनशक्ती आणि आवडीनुसार माहिती दिली जाणार आहे.

मुलांना होणारे फायदे

  • सुरक्षित संवाद: हे ॲप कोणत्याही अनुचित व आक्षेपार्ह मजकुराविना मुलांना योग्य माहिती पुरवेल. त्यामुळे पालकही निश्चिंत राहू शकतात.
  • खेळातून शिक्षण: शैक्षणिक खेळ, कथा सांगणे, कोडी व प्रश्न यांद्वारे मुले खेळता खेळता नवे काही शिकू शकतील.
  • विचारशक्तीचा विकास: या ॲपचा वापर केल्यामुळे मुलांची भाषा, तर्कशक्ती व प्रश्न विचारण्याची सवय विकसित होईल. हे त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे ठरेल.
  • पालक नियंत्रण: या ॲपमध्ये पालकांसाठी विशेष नियंत्रण पर्याय असतील, ज्यामुळे कंटेंट निवडता येईल आणि वापरावर लक्ष ठेवता येईल.
Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या