Home / लेख / Viral Video: ‘या’ राजाचा थाटच वेगळा! 15 पत्नी आणि 100 नोकरांसह प्रायव्हेट जेटने दौरा, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: ‘या’ राजाचा थाटच वेगळा! 15 पत्नी आणि 100 नोकरांसह प्रायव्हेट जेटने दौरा, व्हिडिओ व्हायरल

King Mswati III Viral Video: दक्षिण आफ्रिकेतील छोटे राष्ट्र एस्वातिनी (Eswatini) चे राजा मस्वाती III (King Mswati III) यांच्या अति-शाही...

By: Team Navakal
King Mswati III Viral Video

King Mswati III Viral Video: दक्षिण आफ्रिकेतील छोटे राष्ट्र एस्वातिनी (Eswatini) चे राजा मस्वाती III (King Mswati III) यांच्या अति-शाही आणि खर्चाळू जीवनशैलीचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये राजा मस्वाती III हे त्यांच्या 15 पत्नी आणि 100 हून अधिक नोकर-चाकर वर्गासह अबू धाबी विमानतळावर प्रायव्हेट जेटमधून उतरताना दिसतात.

विशाल शाही ताफ्यामुळे विमानतळावर गोंधळ

जुलैमध्ये सर्वप्रथम समोर आलेल्या या फुटेजमध्ये आफ्रिकेतील एकमेव निरंकुश शासक असलेले मस्वाती III पारंपरिक वेशभूषेत मोठ्या थाटात जेटमधून खाली उतरतात. त्यांच्या मागोमाग सुंदर आणि शाही पोषाखात अनेक महिला आणि एक मोठा कर्मचारी वर्ग दिसतो. राजा त्यांच्या 30 हून अधिक मुलांसह या दौऱ्यावर होते.

या प्रचंड मोठ्या शाही ताफ्यामुळे विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना काही काळ अनेक टर्मिनल बंद करावे लागले होते, ज्यामुळे विमानतळावर तात्पुरता गोंधळ निर्माण झाला.

गरीबी विरुद्ध राजाचा खर्च: जोरदार टीका

राजा मस्वाती III हे 1986 पासून एस्वातिनीवर राज्य करत आहेत आणि त्यांची वैयक्तिक संपत्ती $1 अब्ज पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या या अफाट संपत्ती आणि खर्चाची तुलना देशातील सामान्य नागरिकांच्या परिस्थितीशी केल्यामुळे सोशल मीडियावर मोठी टीका होत आहे.

एस्वातिनी देशाची भयानक स्थिती:

राजाचा हा शाही थाट देशाच्या आर्थिक परिस्थितीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. एस्वातिनीची सुमारे 60% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. देशाची आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था ढासळली आहे. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये औषधांचा तीव्र तुटवडा आहे.

वर्ल्ड बँकेच्या (World Bank) आकडेवारीनुसार, 2021 मध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण 33.3% पर्यंत वाढले आहे. राजा मस्वाती III यांचे बांधकाम, पर्यटन, कृषी, दूरसंचार आणि वनीकरण (Forestry) यांसारख्या अनेक उद्योगांमध्ये मोठे भागभांडवल आहे.

राजा मस्वाती III हे दरवर्षी ‘रीड डान्स’ या जुन्या प्रथेनुसार नवी पत्नी निवडतात. राजघराणे प्रचंड ऐषोआराम करत असताना, सामान्य जनतेचे जीवन मात्र अत्यंत कठीण आहे.

हे देखील वाचा – दिवाळीपूर्वी महावितरणचा झटका! वीज बिलात होणार मोठी वाढ; नवीन दर पहा

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या