Weight Loss Diets: लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगला आहार घेत असतात. मात्र, अशा डाएट्समुळे शरीराचे प्रचंड नुकसान होऊ शकते. प्रामुख्याने फॅड डाएट्स (Fad Diets) अनेकदा फायद्याऐवजी शरीराचे अधिक नुकसान करतात.
आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांनुसार अनेकदा ट्रेंडमध्ये असलेल्या ज्यूस क्लीन्सेसकिंवा डाएट ड्रिंक्ससारख्या उपायांमुळे शरीरातील आवश्यक पोषणतत्त्वे कमी होतात, रक्तातील साखर वाढते किंवा चयापचय बिघडतो.
मेटाबॉलिझम आणि हार्मोन आरोग्याच्या विशेषज्ञ, एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. अलेसिया रोएनेल्टनी वजन कमी करण्यासाठी 3 फॅड डाएट्स न पाळण्याचा सल्ला दिला आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी फॅड डाएट्सऐवजी अधिक आरोग्यदायी व कायमस्वरूपी पर्याय सुचवले.
डॉक्टरने टाळण्यास सांगितलेले 3 फॅड डाएट्स
ज्यूस क्लीन्सेस (Juice Cleanses):
ज्यूस बनवताना फळामधील फायबर काढून टाकले जाते आणि फक्त साखर शरीरात जाते. यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते आणि तुम्हाला लगेच भूक लागते. त्याऐवजी, फायबर समृद्ध संपूर्ण फळे आणि भाज्या, सोबतच पुरेसे प्रोटीनआणि पाणी घ्यावे.
डाएट ड्रिंक्स (Diet Drinks):
डाएट सोडा (Diet Sodas) आणि इतर डाएट ड्रिंक्समध्ये कृत्रिम स्वीटनर्स भरलेले असतात. हे पोटाच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत, यामुळे संभाव्यतः इन्सुलिन पातळी वाढवू शकतात. त्याऐवजी कृत्रिम स्वीटनर-मुक्त पर्याय जसे की स्पार्कलिंग वॉटर, लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स निवडा.
प्रोटीन बार्स (Protein Bars):
सध्या प्रोटीन बार्सची लोकप्रियता वाढली आहे. परंतु, यात भरपूर कार्ब्स (Carbs), कमी-गुणवत्तेचे प्रोटीन आणि कृत्रिम स्वीटनर्स असतात, ज्यामुळे तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटते आणि नंतर थकवा जाणवतो.
त्याऐवजी उकडलेले अंडे किंवा मूठभर सुका मेवायांसारखे आरोग्यदायी फॅट किंवा प्रोटीनचे स्रोत असलेले नैसर्गिक पदार्थ खा.
हे देखील वाचा – Sedan Car Price: GST 2.0 चा धमाका! Hyundai Aura सह 5 सेडान कार्स झाल्या स्वस्त; 1.20 लाख रुपयांपर्यंतची बचत