Home / लेख / Fastrack ने आणली AI स्मार्टवॉच; 10 मिनिटांत चार्ज होऊन दिवसभर चालेल; पाहा किंमत व फीचर्स

Fastrack ने आणली AI स्मार्टवॉच; 10 मिनिटांत चार्ज होऊन दिवसभर चालेल; पाहा किंमत व फीचर्स

Best Smartwatch

Best Smartwatch: लोकप्रिय वेअरेबल ब्रँड Fastrack ने भारतीय बाजारात आपली नवीन Mynd AI-पॉवर्ड स्मार्टवॉच लाँच केली आहे. कमी किमतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनसह येणारी ही वॉच AI-पॉवर्ड वॉचफेस, AI चॅट, व्हॉईस कमांड आणि ब्लूटूथ कॉलिंग सारख्या अनेक दमदार फीचर्सनी सुसज्ज आहे.

Fastrack Mynd Smartwatch ची किंमत आणि उपलब्धता

Fastrack Mynd स्मार्टवॉचची भारतातील किंमत केवळ 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही वॉच तुम्ही Fastrack स्टोअर्स, Titan World आउटलेट्स, Fastrack च्या वेबसाइटवरून तसेच सर्व प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता.

Mynd स्मार्टवॉचचे खास फीचर्स

Fastrack Mynd मध्ये 4.9 सेमी (1.93 इंच) ची कर्व्ड AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे, जी 2.5D ग्राफिक्ससह उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव देते. या वॉचची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिचे AI-आधारित फीचर्स. यात अनलिमिटेड AI वॉचफेसेस, AI चॅट, कॉन्टेक्स्टुअल रिमाइंडर्स आणि AI सर्च सारखे फिचर उपलब्ध आहेत. यूजर्सच्या सवयी आणि आवडीनुसार ही वॉच स्वतःच मेसेज रिमाइंडर किंवा वॉचफेस बदलू शकते.

इतर महत्त्वाच्या फीचर्समध्ये ऑफलाइन व्हॉईस कमांडचा पर्याय समाविष्ट आहे, ज्यामुळे इंटरनेटशिवायही कॉल किंवा इतर फंक्शन्स नियंत्रित करता येतात. तसेच, ब्लूटूथ कॉलिंगच्या सुविधेमुळे तुम्ही थेट वॉचवरून कॉल घेऊ आणि करू शकता.

ही स्मार्टवॉच तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेते. यात हार्ट रेट, SpO₂, स्लीप पॅटर्न्स आणि महिलांसाठी खास हेल्थ मोडचा समावेश आहे. 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या फिटनेसवर लक्ष ठेवू शकता.

IP68 वॉटर-डस्ट रेझिस्टन्स असल्यामुळे तुम्ही पोहताना किंवा व्यायाम करतानाही ती वापरू शकता. USB Type-C फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ही वॉच दिवसभर चालू शकते.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

UPI व्यवहाराची मर्यादा वाढली; 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येणार, ‘या’ क्षेत्रांना मिळणार मोठा फायदा

जीएसटीचे 2 स्लॅब रद्द! कोणत्या वस्तू स्वस्त-कोणत्या वस्तू महाग झाल्या, पाहा संपूर्ण यादी

 मुंबईतील आंदोलन संपताच मराठ्यांवर नऊ गुन्हे दाखल