Gmail Security Warning: जगातील 2.5 अब्ज Gmail यूजर्ससाठी गुगलने (Google) एक मोठा इशारा दिला आहे. हॅकर्सकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्यामुळे गुगलने सर्व यूजर्सला तात्काळ त्यांचे पासवर्ड बदलण्यास आणि टू-स्टेप व्हेरिफिकेशन (Two-Step Verification – 2SV) चालू करण्यास सांगितले आहे.
‘शायनीहंटर्स’ (ShinyHunters) नावाच्या हॅकिंग ग्रुपमुळेही (Gmail Security Warning) धोक्याची पातळी वाढली आहे.
या ग्रुपने AT&T, मायक्रोसॉफ्ट आणि सँटँडर यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या डेटा चोरी केल्याचे मानले जाते. ‘शायनीहंटर्स’ हे ‘फिशिंग’ (phishing) द्वारे डेटा चोरी करत आहेत. याद्वारे ते बनावट ईमेल पाठवून युजर्सकडून लॉग-इन डिटेल्स किंवा पासवर्ड मिळवतात.
टू-स्टेप व्हेरिफिकेशन का आवश्यक आहे?
टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2SV) तुमच्या डिजिटल खात्यांना अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते. जरी हॅकर्सना तुमचा पासवर्ड मिळाला, तरी त्यांना तुमच्या खात्यात प्रवेश करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर येणारा दुसरा कोड आवश्यक असतो. या लहानश्या उपायामुळे तुम्ही हॅकर्सपासून सुरक्षित राहू शकता.
गुगलने Gmail यूजर्सला ईमेल पाठवून तातडीने सुरक्षा वाढवण्याचा सल्ला दिला होता. तुमचा ईमेल आयडी हा बँक, सोशल मीडिया आणि शॉपिंग वेबसाइट्सवर लॉगइन करण्याठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे जर Gmail हॅक झाले तर तुमचे इतर सर्व खातीही धोक्यात येऊ शकतात.
गुगलचा स्पष्ट संदेश
या धोक्यापासून वाचण्यासाठी गुगलने एक स्पष्ट संदेश दिला आहे: तुम्ही हॅक होण्याची वाट पाहू नका!
- पासवर्ड बदला: सर्वात आधी तुमच्या Gmail खात्याचा पासवर्ड मजबूत करा.
- टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू करा: तुमच्या खात्याच्या सुरक्षा सेटिंग्जमध्ये जाऊन 2SV लगेच चालू करा. हे करण्यासाठी काही मिनिटेच लागतात, पण त्यामुळे तुमचे खाते सुरक्षित राहते.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…
राज ठाकरे कुचक्या कानाचे ! मनोज जरांगेंचा हल्लाबोल
खानचंदानींच्या मृत्यूला उबाठा नेता जबाबदार! पतीचा पत्रकार परिषदेत आरोप