Google AI Bug Bounty Program: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान आपल्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाविष्ट करणाऱ्या Google ने आता याच तंत्रज्ञानाच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने एआय प्रणालीमधील त्रुटी आणि धोके शोधण्यासाठी एक विशेष ‘बग बाउंटी’ (Bug Bounty) कार्यक्रम जाहीर केला आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत सिक्युरिटी रिसर्चर आणि एथिकल हॅकर्सना Google च्या एआय सिस्टीममध्ये त्रुटी शोधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्रुटी शोधणाऱ्याला 30,000 डॉलर्स (जवळपास 26 लाख रुपये) पर्यंत बक्षीस दिले जाईल.
Google AI Bug Bounty Program: पारंपारिक बग्सपेक्षा वेगळे एआय धोके
Google चा हा नवीन उपक्रम त्यांच्या जुन्या Vulnerability Reward Program चा विस्तार आहे, परंतु त्याचे लक्ष आता वाढत असलेल्या एआय सुरक्षा क्षेत्रावर आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की एआयमधील सुरक्षा धोके पारंपारिक सॉफ्टवेअरमधील बग्सपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.
Google ला अशा त्रुटी ओळखण्यास मदत हवी आहे, जिथे एआय धोकादायक पद्धतीने वागू शकते. यात खासगी डेटा लीक करणे, चुकीचे कमांड्स कार्यान्वित करणे किंवा हॅकर्सना कनेक्टेड डिव्हाइसेसवर (नियंत्रण मिळवण्यास मदत करणे यांसारख्या समस्यांचा समावेश आहे.
Google AI Bug Bounty Program: कोणत्या त्रुटी ‘एआय बग’ म्हणून गणल्या जातील?
संशोधकांनी कोणत्या प्रकारच्या त्रुटी शोधायच्या आहेत याबाबत कंपनीने माहिती दिली आहे.
उदाहरणार्थ: एखादा हल्लेखोर Google Home ला फसवून स्मार्ट दरवाजा अनलॉक करेल किंवा Gmail ला गुप्त कमांड देऊन युजरच्या ईमेलमधील माहिती इतरांना पाठवेल.
कंपनी अशाप्रकारच्या त्रुटी शोधून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे.
Google AI Bug Bounty Program: बक्षिसाची रक्कम किती मिळणार?
त्रुटी शोधणाऱ्यांना गुगल 20 हजार डॉलर्सपासून ते 30 हजार डॉलर्सपर्यंत बक्षीस देत आहे.
Google ने ‘CodeMender’ टूलही केले लाँच
बग बाउंटी कार्यक्रमासोबतच, Google ने ‘CodeMender’ नावाचे एक नवीन टूल देखील सादर केले आहे. हे एक एआय एजंट असून, जे ओपन-सोर्स सॉफ्टवेअरमधील सुरक्षा त्रुटी आपोआप शोधून दुरुस्त करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
हे देखील वाचा – कोण आहेत अनिरुद्धाचार्य आणि अजित भारती? सरन्यायाधीशांविरोधात चिथावणीखोर विधाने केल्याचा आरोप; कारवाईची मागणी