Google Pixel 10 : स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ॲमेझॉनची बहुप्रतिक्षित ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ 16 जानेवारीपासून सुरू होत आहे, मात्र त्यापूर्वीच गुगलचा लेटेस्ट फ्लॅगशिप फोन ‘पिक्सेल 10’ वर मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे.
भारतात 79,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला हा फोन आता सेल सुरू होण्याआधीच १० हजार रुपयांहून अधिक स्वस्त मिळत आहे. गुगलचा क्लीन सॉफ्टवेअर अनुभव आणि प्रगत एआय फीचर्स आवडणाऱ्या लोकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
गुगल पिक्सेल 10 वर मिळणारे जबरदस्त ऑफर्स
गुगल पिक्सेल 10 ची मूळ किंमत 79,999 रुपये असली तरी, ॲमेझॉनवर सध्या या फोनवर 10,119 रुपयांची थेट सूट मिळत आहे. यामुळे या फोनची प्रभावी किंमत केवळ 69,880 रुपये झाली आहे. या व्यतिरिक्त, ग्राहकांसाठी काही विशेष बॅंक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत:
- HDFC बॅंक क्रेडिट कार्ड: ईएमआय पर्यायावर 1,500 रुपयांची अतिरिक्त सूट.
- IDFC फर्स्ट बॅंक क्रेडिट कार्ड: ईएमआय पर्यायावर 1,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट.
- एक्स्चेंज ऑफर: जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल, तर तो बदलून तुम्ही 43,300 रुपयांपर्यंतचे एक्स्चेंज व्हॅल्यू मिळवू शकता. (एक्स्चेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल).
गुगल पिक्सेल 10 ची दमदार वैशिष्ट्ये
- डिस्प्ले: या फोनमध्ये 6.3 इंचाचा ओएलईडी स्क्रीन देण्यात आला असून तो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याची पीक ब्राइटनेस 3,000 निट्स आहे, ज्यामुळे उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते. संरक्षणासाठी यात गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 वापरण्यात आला आहे.
- प्रोसेसर आणि स्टोरेज: फोनमध्ये गुगलचा शक्तिशाली टेन्सर जी 5 चिपसेट आहे. यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते.
- कॅमेरा सेटअप: फोटोग्राफीसाठी यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 13 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेन्स आणि 5x ऑप्टिकल झूमसह 10.8 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फीसाठी 10.5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
- बॅटरी: डिव्हाइसमध्ये 4,970 एमएएचची बॅटरी असून ती 30 वॅट फास्ट चार्जिंग आणि 15 वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
फ्लॅगशिप स्मार्टफोनवर अशा प्रकारच्या डील्स सहसा कमी पाहायला मिळतात, त्यामुळे नवीन फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही योग्य वेळ आहे.
हे देखील वाचा – Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना संक्रांतीला ‘अॅडव्हान्स’ नाही! निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला मोठा दणका; थकलेले पैसेच मिळणार









