Home / लेख / धमाकेदार फीचर्ससह Google Pixel 10a भारतात लाँच, खास ऑफरसह खरेदीची संधी; पाहा डिटेल्स

धमाकेदार फीचर्ससह Google Pixel 10a भारतात लाँच, खास ऑफरसह खरेदीची संधी; पाहा डिटेल्स

Google Pixel 10a : स्मार्टफोन प्रेमींसाठी गुगलने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. गुगलने आपल्या नवीन पिक्सेल 10 सीरीजमधील सर्वात...

By: Team Navakal
Google Pixel 10a
Social + WhatsApp CTA

Google Pixel 10a : स्मार्टफोन प्रेमींसाठी गुगलने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. गुगलने आपल्या नवीन पिक्सेल 10 सीरीजमधील सर्वात परवडणारा स्मार्टफोन ‘पिक्सेल 10a’ (Pixel 10a) भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे उतरवला आहे. आकर्षक लूक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेला हा फोन जागतिक स्तरावरही सादर करण्यात आला आहे.

किंमत आणि सेलची तारीख

या नवीन स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 49,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. लॅव्हेंडर, ऑब्सिडियन, फॉग आणि बेरी अशा ४ आकर्षक रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. या फोनचे प्री-ऑर्डर बुकिंग आता सुरू झाले असून, ६ मार्च 2026 पासून हा फोन ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लाँच ऑफर्स आणि डिस्काउंट

गुगलने या फोनवर काही खास ऑफर्सही जाहीर केल्या आहेत:

  • निवडक बँकांच्या कार्डवर ग्राहकांना 3,000 रुपयांचा त्वरित कॅशबॅक मिळू शकतो.
  • याशिवाय, ग्राहकांसाठी २४ महिन्यांपर्यंत ‘नो कॉस्ट ईएमआय’ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पिक्सेल 10a चे दमदार फीचर्स:

मेमरी: हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध असेल.

डिस्प्ले: यात 6.3 इंचाचा डिस्प्ले असून तो 3,000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. पिक्सेल ए-सीरीजमधील हा आतापर्यंतचा सर्वात तेजस्वी डिस्प्ले ठरणार आहे.

प्रोसेसर आणि सुरक्षा: उत्तम परफॉर्मन्ससाठी यात गुगलचे स्वतःचे टेन्सर G4 चिपसेट दिले आहे. तसेच, युजरच्या डेटा सुरक्षेसाठी टायटन M2 सिक्युरिटी को-प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअप: फोटोग्राफीसाठी मागील बाजूस दोन कॅमेरे आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा मुख्य वाइड-अँगल लेन्स आणि १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी समोर १३ मेगापिक्सलचा कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरी बॅकअप: फोनमध्ये 5,100 एमएएच क्षमतेची बॅटरी असून ती ३० व्हॅट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि १० व्हॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी ३० तासांचा बॅकअप देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या