Google Pixel 10a price discount offers : स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण करणाऱ्या गुगलने गेल्या महिन्यात भारतात Google Pixel 10a लाँच केला होता. आता हा प्रीमियम फोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर या फोनवर भारी डिस्काउंट आणि आकर्षक एक्सचेंज ऑफर्स दिल्या जात आहेत. सुरक्षितता आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा हा फोन आता कमी किमतीत घरी नेण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.
Google Pixel 10a Offer: किंमत आणि धमाकेदार ऑफर्स
Google Pixel 10a चा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट सध्या 49,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. मात्र, एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना 3,000 रुपयांचा थेट डिस्काउंट मिळू शकतो, ज्यामुळे या फोनची प्रभावी किंमत 46,999 रुपये होते.
याव्यतिरिक्त, जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 47,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते, ज्यामध्ये 3,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस देखील समाविष्ट आहे.
Google Pixel 10a Offer: काय आहेत या फोनची वैशिष्ट्ये?
- डिस्प्ले: या फोनमध्ये 6.3 इंचाचा ॲक्टुआ pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz असून 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळते. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन दिले आहे.
- प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर: हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर चालतो. यामध्ये गुगलचा स्वतःचा ‘टेन्सर G4’ प्रोसेसर आणि सुरक्षिततेसाठी ‘टायटन M2’ को-प्रोसेसर वापरला आहे. विशेष म्हणजे, कंपनी या फोनसाठी पुढील 7 वर्षांपर्यंत ओएस आणि सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे.
- कॅमेरा सेटअप: फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा (OIS सपोर्टसह) आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी समोरच्या बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा उपलब्ध आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग: फोनमध्ये 5,100mAh ची मोठी बॅटरी असून ती 30W वायर्ड आणि 10W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनला IP68 रेटिंग मिळाले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, वाय-फाई 6e आणि एनएफसी सारखे आधुनिक पर्याय मिळतात.











