Offers on Google Pixel 9 | तुम्ही नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.! 79,999 रुपयांना भारतात लाँच झालेल्या Google Pixel 9 स्मार्टफोन आता बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा फोन आता फ्लिपकार्टवर (Flipkart) तब्बल 15,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
थेट डिस्काउंट आणि बँक ऑफर्सच्या मदतीने तुम्ही या प्रीमियम स्मार्टफोनला मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. Google Pixel 9 वरील या ऑफर्सविषयी जाणून घेऊयात.
फ्लिपकार्टवर Pixel 9 वरील डिस्काउंट:
- थेट किंमत कपात: फ्लिपकार्टने गुगल पिक्सल 9 च्या मूळ किमतीत आधीच 5,000 रुपयांची कपात केली आहे, ज्यामुळे याची किंमत आता ₹74,999 झाली आहे.
- एचडीएफसी बँक ऑफर: जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने ईएमआयवर पेमेंट केले, तर तुम्हाला अतिरिक्त 10,000 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच, हा फोन तुम्हाला फक्त 64,999 रुपयांना मिळू शकेल. तुम्ही ही रक्कम 24 महिन्यांपर्यंत विनाअतिरिक्त शुल्काचे हप्त्यांमध्ये भरू शकता.
एक्सचेंजवर अधिक बचत:
जर तुमच्याकडे Google Pixel 8a (किंवा इतर मॉडेल) असेल, तर तुम्ही तो एक्सचेंज करून तब्बल 20,600 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. याचा विचार केल्यास, नवीन Pixel 9 ची प्रभावी किंमत केवळ 44,399 रुपये होते. म्हणजेच, गुगलच्या या फोनला त्याच्या मूळ लॉन्चिंग किमतीपेक्षा तब्बल 35,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह खरेदी करता येईल.
Google Pixel 9 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स:
Google Pixel 9 मध्ये 6.3-इंचाचा फुल-एचडी+ OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आणि पीक ब्राइटनेस 2,700 निट्सपर्यंत आहे. यासोबतच, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 मुळे accidental drops पासून स्क्रीन सुरक्षित राहते.
फोनमध्ये Google चा कस्टम टेन्सर G4 चिपसेट आहे, जो स्मार्ट जेमिनी एआय फीचर्स जसे की रिअल-टाइम ट्रान्सलेशन आणि कॅमेरा एन्हांसमेंट्स देतो. 4,700mAh ची बॅटरी आरामात दिवसभर टिकते आणि 45W वायर्ड चार्जिंगमुळे लवकर चार्ज होते.
मोबाइल फोटोग्राफी आवडणाऱ्यांसाठी, Pixel 9 मध्ये 50MP चा मुख्य सेन्सर आणि 48MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी 10.5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Pixel 9 अँड्रॉइड 14 सोबत येतो. कंपनी सात वर्षांपर्यंत ओएस आणि सुरक्षा अपडेट्स देणार आहे.