Home / लेख / Google Pixel 9a च्या किमतीत मोठी कपात; Amazon वर मिळतेय भारी सूट

Google Pixel 9a च्या किमतीत मोठी कपात; Amazon वर मिळतेय भारी सूट

Google Pixel 9a : पुढील आठवड्यात गुगल आपला नवीन स्मार्टफोन Pixel 10a बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर, सध्याच्या लोकप्रिय...

By: Team Navakal
Google Pixel 9a
Social + WhatsApp CTA

Google Pixel 9a : पुढील आठवड्यात गुगल आपला नवीन स्मार्टफोन Pixel 10a बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर, सध्याच्या लोकप्रिय Google Pixel 9a मॉडेलवर ॲमेझॉनने मोठी सवलत जाहीर केली आहे. जे युजर्स क्लिन अँड्रॉइड सॉफ्टवेअर आणि प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे.

Google Pixel 9a चे प्रमुख फीचर्स:

  • डिस्प्ले: फोनमध्ये 6.3 इंचाचा AMOLED स्क्रीन देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण मिळते.
  • ब्राइटनेस: याचा डिस्प्ले 1800 निट्स (HDR) आणि कमाल 2700 निट्सपर्यंतची ब्राइटनेस देतो, ज्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट दिसते.
  • प्रोसेसर: उत्तम कामगिरीसाठी यात गुगलचा स्वतःचा शक्तिशाली Tensor G4 चिपसेट वापरण्यात आला आहे.
  • कॅमेरा सेटअप: मागे ड्युअल कॅमेरा असून यात 48MP मुख्य कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाईड लेन्स आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 13MP कॅमेरा दिला आहे.
  • बॅटरी: दीर्घकाळ वापरासाठी फोनमध्ये 5100mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
  • सॉफ्टवेअर: हा फोन गुगलच्या क्लिन सॉफ्टवेअर अनुभवासह येतो, ज्यामध्ये युजर्सना वेळेवर अपडेट्स मिळतात.

किंमत आणि ऑफर:

Google Pixel 9a (8GB RAM + 256GB स्टोरेज) भारतात 49,999 रुपयांना लाँच झाला होता. मात्र, सध्या ॲमेझॉनवर हा फोन 38,648 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना यावर 11,351 रुपयांचा थेट डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय जुना फोन एक्सचेंज केल्यास 35,950 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या