Home / लेख / GST चा ग्राहकांना मोठा फायदा! 5 लोकप्रिय डिझेल SUV च्या किमतीत 1.86 लाख रुपयांपर्यंत कपात

GST चा ग्राहकांना मोठा फायदा! 5 लोकप्रिय डिझेल SUV च्या किमतीत 1.86 लाख रुपयांपर्यंत कपात

Compact SUV Price: देशात नवीन GST 2.0 लागू झाल्यानंतर कार बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. यामुळे ग्राहकांना थेट लाभ मिळत...

By: Team Navakal
Compact SUV Price

Compact SUV Price: देशात नवीन GST 2.0 लागू झाल्यानंतर कार बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. यामुळे ग्राहकांना थेट लाभ मिळत असून, Kia, Tata, आणि Mahindra सारख्या कंपन्यांच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट डिझेल SUV च्या किमती 1.86 लाख रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत.

मोठ्या कर कपातीमुळे या 5 डिमांडिंग मॉडेल्सची खरेदी आता अधिक परवडणारी झाली आहे, ज्यामुळे सेगमेंटमधील स्पर्धा वाढणार आहे.

किंमत कपातीनंतरच्या Top 5 आकर्षक डिझेल SUV

महिंद्रा थार (Mahindra Thar)

महिंद्राची लोकप्रिय ऑफ-रोडर थार आता अधिक स्वस्त झाली आहे. LX 2WD व्हेरियंटच्या किमतीत 1.35 लाख रुपयांची मोठी घट झाली आहे. यामुळे रस्त्यावर मजबूत उपस्थिती आणि साहसी अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी थार एक सोपा पर्याय बनला आहे.

टाटा नेक्सन (Tata Nexon)

भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्ट SUV पैकी एक असलेली टाटा नेक्सॉन या कपातीमुळे अधिक आकर्षक झाली आहे. Fearless Plus PS DK व्हेरियंटच्या किमतीत थेट 1.55 लाख रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. सुरक्षितता, सुविधा आणि अत्यंत स्पर्धात्मक किंमत यामुळे नेक्सॉनचे बाजारातील स्थान आणखी मजबूत होईल.

महिंद्रा XUV 3XO (Mahindra XUV 3XO)

महिंद्राच्या कॉम्पॅक्ट SUV 3XO च्या AX7L व्हेरियंटच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, ग्राहकांना 1.56 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळत आहे. या किंमत कपातीमुळे, XUV 3XO डिझेल सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करेल.

किआ सोनेट (Kia Sonet)

किआची सब-4 मीटर SUV सोनेट आता अधिक परवडणारी झाली आहे. GTX Plus AT व्हेरियंटवर 1.64 लाख रुपयांपर्यंत सूट जाहीर झाली आहे. स्टाईल आणि फीचर्समुळे सोनेटला या डिस्काउंटमुळे बाजारात अधिक चांगली स्थिती मिळेल.

किआ सेल्टोस (Kia Seltos)

पॅसेंजर वाहनांमध्ये सर्वाधिक सूट किआ सेल्टोसला मिळत आहे. HTX+ (O) AT व्हेरियंट खरेदी करणाऱ्यांना थेट 1.86 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. प्रीमियम अनुभव आणि शक्तिशाली इंजिन यामुळे सेल्टोस आता नवीन, आकर्षक किमतीत उपलब्ध झाली आहे.

हे देखील वाचा – भविष्यात मुलगी देखील राजकारणात येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या