Home / लेख / Heart Blockage Symptoms : हार्ट अटॅकचा धोका टाळायचा असेल तर ‘या’ 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वेळीच सावध व्हा!

Heart Blockage Symptoms : हार्ट अटॅकचा धोका टाळायचा असेल तर ‘या’ 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वेळीच सावध व्हा!

Heart Blockage Symptoms : धावपळीच्या जीवनशैलीत आपण अनेकदा शरीराकडे दुर्लक्ष करतो, मात्र हृदयाच्या बाबतीत केलेले दुर्लक्ष जीवावर बेतू शकते. हार्ट...

By: Team Navakal
Heart Blockage Symptoms
Social + WhatsApp CTA

Heart Blockage Symptoms : धावपळीच्या जीवनशैलीत आपण अनेकदा शरीराकडे दुर्लक्ष करतो, मात्र हृदयाच्या बाबतीत केलेले दुर्लक्ष जीवावर बेतू शकते. हार्ट ब्लॉकेज किंवा कोरोनरी आर्टरी डिसीज ही समस्या एका रात्रीत निर्माण होत नाही.

हृदयविकाराचा मोठा झटका येण्यापूर्वी आपले शरीर ओरडून काही संकेत देत असते. जर आपण ही लक्षणे प्राथमिक टप्प्यावरच ओळखली, तर होणारा मोठा अनर्थ टाळता येऊ शकतो.

हृदयात अडथळे (Blockage) निर्माण होण्याची कारणे

लक्षणे समजून घेण्यापूर्वी हे अडथळे नेमके का निर्माण होतात, हे जाणून घेणे गरजेचे आहे:

  • चुकीची जीवनशैली: तासनतास एकाच जागी बसून काम करणे आणि व्यायामाचा अभाव.
  • व्यसने: धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन रक्तवाहिन्यांना अरुंद करते.
  • आहार: रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये थर जमा करते.
  • आजार: हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब) आणि मधुमेहामुळे हृदयावर ताण येतो.
  • अनुवांशिकता: कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असल्यास धोका अधिक असतो.

शरीर देतं ‘हे’ 5 धोक्याची लक्षणे

सतत येणारा थकवा: पुरेशी झोप आणि विश्रांती घेऊनही जर तुम्हाला दिवसा कामात प्रचंड थकवा जाणवत असेल, तर ते हृदय कमकुवत झाल्याचे लक्षण असू शकते.

धडधडणे आणि चक्कर येणे: हृदयाचे ठोके अचानक अनियंत्रित होणे किंवा वेगाने धडधडणे हे ब्लॉकेजचे लक्षण असू शकते. यामुळे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने चक्कर किंवा डोके हलके झाल्यासारखे वाटते.

हात, पाठ किंवा जबड्यात वेदना: अनेकदा हृदयाचा त्रास केवळ छातीतच जाणवतो असे नाही. डावा हात, मान, पाठीचा वरचा भाग किंवा जबड्यात होणाऱ्या वेदना हे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असल्याचे संकेत असू शकतात.

श्वास घेताना त्रास होणे: साध्या पायऱ्या चढताना किंवा थोडे चालल्यावरही जर तुम्हाला खूप धाप लागत असेल, तर समजावे की तुमच्या हृदयाला शरीराची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागत आहे.

छातीत जडपणा आणि जळजळ: छातीवर कोणीतरी वजन ठेवल्यासारखे वाटणे, जडपणा किंवा अस्वस्थ करणाऱ्या वेदना होणे याला ‘एंजिना’ म्हणतात. शारीरिक हालचाल करताना हा त्रास वाढतो.

हे देखील वाचा – Sushma Andhare : ‘मला आज सर्वात जास्त वाईट तुमच्याबद्दल वाटतंय’; सुषमा अंधारेंचा केशव उपाध्येंना मर्मावर बोट ठेवणारा टोला

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या