Hero Splendor Price Cut: जीएसटी स्लॅब्समधील बदलांमुळे वाहन कंपन्यांनी गाड्यांच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. भारताची सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
कंपनीने GST 2.0 चा पूर्ण फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे Hero च्या सर्व बाईक आणि स्कूटरच्या किमतीत मोठी कपात होणार आहे.
22 सप्टेंबर 2025 पासून हे नवीन दर लागू होतील. नवरात्री आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळात दुचाकींची खरेदी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे कंपनीचा हा निर्णय योग्य वेळी आला आहे.
कोणत्या बाईक आणि स्कूटर किती स्वस्त झाल्या?
Hero च्या लोकप्रिय बाईक्स आणि स्कूटर आता 5,800 ते 15,700 रुपयांपर्यंत स्वस्त मिळणार आहेत. कंपनीने प्रत्येक सेगमेंटमध्ये किमती कमी केल्या आहेत. लहान स्कूटरपासून ते 125cc बाईक आणि प्रीमियम मॉडेल्सपर्यंत, सगळ्या ग्राहकांना याचा फायदा होईल.
सर्वात जास्त फायदा Karizma 210 वर मिळत आहे, ज्याची किंमत तब्बल 15,743 रुपयांनी कमी झाली आहे. त्यानंतर Xpulse 210 वर 14,516 रुपयांचा फायदा मिळणार आहे. याशिवाय, सर्वसामान्यांची आवडती Splendor+ 6,820 रुपये आणि HF Deluxe 5,805 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे, जर तुम्ही या सणांमध्ये नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर ही एक उत्तम संधी आहे.
Hero बाईकच्या किमतीतील GST कपात
मॉडेल | किती स्वस्त? |
Splendor+ | ₹6,820 |
Passion+ | ₹6,500 |
HF Deluxe | ₹5,805 |
Super Splendor XTEC | ₹7,254 |
Glamour X | ₹7,813 |
Karizma 210 | ₹15,743 |
Xpulse 210 | ₹14,516 |
Xtreme 125R | ₹8,010 |
Xtreme 160R 4V | ₹10,985 |
Xtreme 250R | ₹14,055 |
Destini 125 | ₹7,197 |
Pleasure+ | ₹6,417 |
Xoom 110 | ₹6,597 |
Xoom 125 | ₹7,291 |
Xoom 160 | ₹11,602 |
हे देखील वाचा –
Malegaon bomb blast : मालेगाव बॉम्बस्फोट निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान