Hero च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरने ग्राहकांना लावले वेड, 1 लाख लोकांनी खरेदी केली गाडी; किंमत 50 हजारांपेक्षा कमी

Hero Vida Electric Scooter

Hero Vida Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. चारचाकी वाहनांसोबतच इलेक्ट्रिक दुचाकी वाहने खरेदी करण्याला देखील ग्राहक प्राधान्य देतात. भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या Hero MotoCorp च्या इलेक्ट्रिक ब्रँड Vida ने एक मोठा विक्रम केला आहे.

Vida ने देशात 1 लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये लाँच झालेल्या Vida ब्रँडला हा टप्पा गाठण्यासाठी 34 महिने लागले असून, यामुळे EV सेगमेंटमध्ये त्याची पकड मजबूत झाली आहे.

Vida ची जोरदार वाढ

Vida ने 2025 च्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये Vida चा मार्केट शेअर 6 टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै 2025 मध्ये Vida ने 10,504 युनिट्सची विक्री करण्याची कामगिरी केली आहे.

किंमत ठरली गेम चेंजर

Vida च्या विक्रीतील वाढीमागे Vida VX2 या नवीन मॉडेलचा मोठा वाटा आहे. Hero MotoCorp ने हे मॉडेल इतक्या आकर्षक किमतीत बाजारात आणले आहे की, त्यामुळे इतर कंपन्यांना चांगलीच टक्कर मिळाली आहे.

Vida VX2 Go ची किंमत 44,990 रुपयांपासून सुरू होते. तर Vida VX2 Plus ची किंमत 57,990 रुपयांपासून सुरू होते. याशिवाय, V2 Pro मॉडेलची किंमत 1 लाख 20 हजार रुपयांपासून सुरू होते.

या किंमती BaaS मॉडेलसोबत (बॅटरी भाड्याने घेण्याच्या सुविधेसह) आहेत, म्हणजेच ग्राहक कमी किमतीत स्कूटर खरेदी करू शकतात. या रणनीतीमुळे Vida VX2 भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक बनले आहे.

कंपनीने देशभरात 4,500 हून अधिक चार्जिंग स्टेशनचे (Charging Station) मोठे नेटवर्क उभे केले आहे. यामध्ये Ather Grid चा वापरही समाविष्ट आहे, Hero Vida च्या पोर्टफोलिओमध्ये Vida V2 आणि Vida VX2 सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे, जे वेगवेगळ्या सेगमेंटमधील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतात.