Home / लेख / फक्त 3,999 रुपयांमध्ये लाँच झाला देशातील पहिला हायब्रिड फोन; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये?

फक्त 3,999 रुपयांमध्ये लाँच झाला देशातील पहिला हायब्रिड फोन; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये?

HMD Touch 4G Price: मोबाईल बाजारात HMD कंपनीने एक नवीन आणि वेगळे उत्पादन सादर केले आहे. कंपनीने HMD Touch 4G...

By: Team Navakal
HMD Touch 4G Price

HMD Touch 4G Price: मोबाईल बाजारात HMD कंपनीने एक नवीन आणि वेगळे उत्पादन सादर केले आहे. कंपनीने HMD Touch 4G हा ‘पहिला हायब्रिड फोन’ (First Hybrid Phone) म्हणून भारतात लॉन्च केला आहे. हा हँडसेट फीचर फोन आणि स्मार्टफोनचे मिश्रेण आहे.

3.2-इंच चा QVGA टचस्क्रीन डिस्प्ले, ड्युअल सिम सपोर्ट आणि 2-मेगापिक्सलचा कॅमेरा हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

HMD Touch 4G Price: किंमत आणि उपलब्धता

HMD Touch 4G ची किंमत भारतात 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत त्याच्या 64MB रॅम आणि 128MB इनबिल्ट स्टोरेज असलेल्या व्हेरियंटसाठी आहे.

हा फोन सध्या सियान (Cyan) आणि डार्क ब्लू (Dark Blue) या दोन कलर पर्यायांमध्ये HMD India च्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

कंपनीने लवकरच हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर तसेच निवडक ऑफलाईन रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले आहे.

HMD Touch 4G : हायब्रिड फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : HMD Touch 4G मध्ये 3.2-इंच आकाराचा QVGA टच-सपोर्टेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यावर 2.5D कव्हर ग्लास आहे. युजर्सना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणून हा फोन 4G LTE आणि VoLTE ला सपोर्ट करतो.
  • चिपसेट आणि स्टोरेज: हा फोन Unisoc T127 चिपसेटवर चालतो आणि याची स्टोरेज क्षमता मायक्रोएसडी कार्डद्वारे 32GB पर्यंत वाढवता येते.
  • युजर इंटरफेस: HMD चा हा नवा हँडसेट S30+ Touch UI वर काम करतो. यामध्ये Cloud Apps Suite चा सपोर्ट आहे, ज्यामुळे व्हिडिओ, सोशल आणि युटिलिटी ॲप्स थेट डिव्हाइसवर स्ट्रीम करता येतात. तसेच, युजर्स क्रिकेट स्कोअर, न्यूज आणि HTML5 गेम्स देखील खेळू शकतात.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी, HMD Touch 4G मध्ये LED फ्लॅशसह 2-मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 0.3-मेगापिक्सलचा VGA सेन्सर फ्रंटला आहे.
  • सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी: या हायब्रिड फोनमध्ये एक खास क्विक-कॉल बटन देण्यात आले आहे, ज्याला ICE की म्हटले जाते. या बटणाला तीन वेळा प्रेस केल्यास किंवा एकदा दीर्घकाळ दाबल्यास ते सक्रिय होते.
  • युजर्स Express Chat ॲपद्वारे त्यांच्या कॉन्टॅक्ट्सना टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉल करू शकतात. हे ॲप Android आणि iOS डिव्हाईससाठी मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
  • कनेक्टिव्हिटी : Wi-Fi 802.11, Bluetooth 5.0, GPS, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक यांचा समावेश आहे. हा फोन वायर्ड आणि वायरलेस FM Radio दोन्हीला सपोर्ट करतो.
  • बॅटरी आणि टिकाऊपणा: HMD Touch 4G मध्ये 2,000mAh ची रिमूव्हेबल बॅटरी आहे, जी एका चार्जवर 30 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देते. या फोनला धूळ आणि पाण्याचा प्रतिकार करण्यासाठी IP52 रेटिंग मिळाले आहे.

हे देखील वाचा – Honda Activa 125 vs Suzuki Access 125: GST मुळे 125cc स्कूटर स्वस्त! तुमच्यासाठी कोणता पर्याय चांगला? जाणून घ्या

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या