Honor 200 5G Price Drop: कमी बजेटमध्ये दमदार कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर Honor 200 5G हा एक उत्तम पर्याय आहे. हा फोन सध्या त्याच्या लॉन्च किमतीपेक्षा तब्बल 13,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे आणि 100W फास्ट चार्जिंग सारखे खास फीचर्स आहेत.
Honor 200 5G: किंमत आणि ऑफर
लॉन्चवेळी भारतात Honor 200 5G च्या 8GB+256GB वेरिएंटची किंमत 34,999 रुपये होती, तर 12GB+512GB वेरिएंटची किंमत 39,999 रुपये होती. सध्या Amazon वर याचा 8GB+256GB वेरिएंट (ब्लॅक आणि मूनलाइट व्हाइट दोन्ही कलरमध्ये) फक्त 21,999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच, हा फोन त्याच्या लॉन्च किमतीपेक्षा 13,000 रुपयांनी कमी किमतीत उपलब्ध आहे.
फोनचे प्रमुख फीचर्स
डिस्प्ले Honor 200 5G मध्ये 6.7-इंचचा फुल-एचडी प्लस OLED कर्व्ह्ड डिस्प्ले आहे, जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 4000 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. यामध्ये AI आई कंफर्म डिस्प्ले फीचर आहे, जे डोळ्यांचे संरक्षण करते.
कॅमेरा फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा (OIS सह), 50-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा (OIS सह), आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, समोर 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी आणि चार्जिंग या फोनमध्ये 5200mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार, हा फोन फक्त 15 मिनिटांत 49 टक्के चार्ज होतो.
परफॉर्मन्स हा फोन क्वालकॉमच्या Snapdragon 7 Gen 3 चिपसेटवर काम करतो. तसेच, याची मोटाई केवळ 7.7 एमएम असून, यात अनेक AI फीचर्सचा सपोर्टही मिळतो.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
‘Trump is dead’ ट्रेंडमुळे सोशल मीडियावर खळबळ, ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा कशी पसरली? जाणून घ्या