Honor Robot Phone : तंत्रज्ञान क्षेत्रात दररोज नवनवीन प्रयोग होत असताना Honor कंपनीने आपला एआय आधारित ‘रोबोट फोन’ (Robot Phone) बाजारात आणण्याची तयारी केली आहे. गेल्या महिन्यात या थोड्या वेगळ्या संकल्पनेची केवळ टीझर द्वारे माहिती देण्यात आली होती. हा डिव्हाइस MWC 2025 मध्ये दाखवला जाईल असे कंपनीने सांगितले होते, परंतु त्यांनी चीनमधील एका कार्यक्रमात याचे अनावरण लवकर केले आहे.
गिम्बल कॅमेरा आणि डिझाइन
Honor ने ऑक्टोबरमध्ये “Alpha Plan” नावाचा एक प्लॅन जाहीर केला होती, ज्यात ह्यूमन आणि कोड यांच्यातील अंतर कमी करणारी AI तंत्रज्ञान असणारे एक डिव्हाइस सादर करण्याचे उद्दिष्ट होते. या फोनमध्ये गिम्बल कॅमेरा वापरण्यात आला आहे, जो Apple च्या iPhone 17 Pro प्रमाणे दिसतो, पण तो डिव्हाइसच्या मागील बाजूस अतिशय व्यवस्थित पॅक केलेला आहे.
यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या टीझर व्हिडिओमध्ये या डिव्हाइसमध्ये XYZ मोटर असेंब्ली वापरून भावना व्यक्त करण्याची मानवसदृश क्षमता असल्याचे दर्शवण्यात आले होते. हा टीझर पाहताना तो AI आणि मानवामधील अनपेक्षित मैत्रीवर आधारित Disney चित्रपटासारखा वाटत होता.
हा रोबोट फोन सध्या प्रोटोटाइप स्वरूपात आहे, परंतु यात दोन स्थितीत गिम्बल कॅमेरा दाखवला गेला. एक कॅमेरा बेटासारखा पॅक केलेला आणि दुसरा अॅक्शन मोड मध्ये बाहेर आलेला. या खास वैशिष्ट्यामुळे हा फोनची जाडी थोडी अधिक असल्याचे दिसून येते.
या संकल्पनेतून Honor ने Alpha Plan चा लोगो वगळला आहे. हे डिव्हाइस पूर्व-उत्पादन अवस्थेत असल्याने असू शकते किंवा हा लोगो Sony Alpha च्या लोगोसह असलेल्या साधर्म्यामुळे वगळला गेला असावा.
हा डिव्हाइस बाजारात आल्यास तो काळ्या, पांढऱ्या आणि सोनेरी रंगांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. हा डिव्हाइस मागील बाजूस फॉक्स लेदर किंवा ग्लास पॅनेलसह विक्रीसाठी येईल.
दरम्यान, हा डिव्हाइस कधी लाँच होईल, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही, मात्र 2026 पर्यंत आणखी काही टीझर्स येण्याची शक्यता आहे.









