Home / लेख / Summer Health Tips: उन्हाळ्यात फ्रीजचे पाणी नकोय? थंड पाण्यासाठी ‘असा’ निवडा योग्य माठ; पाहा सोप्या टिप्स

Summer Health Tips: उन्हाळ्यात फ्रीजचे पाणी नकोय? थंड पाण्यासाठी ‘असा’ निवडा योग्य माठ; पाहा सोप्या टिप्स

Summer Health Tips: उन्हाळ्याचा पारा जसा वाढू लागतो, तशी थंड पाण्याची तहानही वाढते. अनेकजण फ्रीजमधील अतिथंड पाण्याऐवजी माठातील नैसर्गिकरित्या थंड...

By: Team Navakal
Summer Health Tips
Social + WhatsApp CTA

Summer Health Tips: उन्हाळ्याचा पारा जसा वाढू लागतो, तशी थंड पाण्याची तहानही वाढते. अनेकजण फ्रीजमधील अतिथंड पाण्याऐवजी माठातील नैसर्गिकरित्या थंड झालेले पाणी पिण्याला पसंती देतात.

माठातील पाणी केवळ घशासाठीच नाही तर पचनसंस्थेसाठीही उत्तम मानले जाते. मात्र, बाजारात मिळणारे सर्वच माठ पाणी व्यवस्थित थंड करतातच असे नाही. म्हणूनच, योग्य माठाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे.

माठ खरेदी करताना ‘या’ 4 गोष्टी नक्की तपासा:

  1. माठाची सच्छिद्रता: चांगल्या माठाला अत्यंत सूक्ष्म छिद्रे असतात, ज्यातून पाणी झिरपते. हे झिरपलेले पाणी बाष्पीभवनाद्वारे माठातील पाणी थंड ठेवण्यास मदत करते. माठ घेताना तो हलका ओला किंवा ओलसर होत असेल तर समजावे की तो दर्जेदार आहे. मात्र, खूप जास्त पाणी गळत असेल तर असा माठ घेऊ नका.
  2. आवाजावरून ओळखा गुणवत्ता: माठ किती कच्चा किंवा पक्का आहे हे त्याच्या आवाजावरून ओळखता येते. माठावर बोटाने हलकी टॅप करून पहा. जर आवाज स्पष्ट आणि धातूसारखा खणखणीत येत असेल, तर तो माठ चांगल्या पद्धतीने भाजलेला आणि मजबूत आहे. जर आवाज बसलेला किंवा डल येत असेल, तर त्यामध्ये तडे असण्याची शक्यता असते.
  3. आकर्षक रंगांना भुलू नका: आजकाल बाजारात नक्षीकाम केलेले आणि गडद रंगवलेले माठ मोठ्या प्रमाणात दिसतात. दिसायला ते सुंदर असले तरी, त्यावर वापरलेल्या रासायनिक रंगांमुळे माठाची नैसर्गिक छिद्रे बंद होतात. परिणामी, पाणी थंड होण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे नेहमी नैसर्गिक तांबूस, तपकिरी किंवा फिक्कट रंगाचे साधे माठ निवडणे हिताचे ठरते.
  4. आकार आणि डिझाइन: नेहमी पसरट तोंडाचा माठ निवडावा. यामुळे हवेचे अभिसरण चांगले होते आणि पाणी लवकर थंड होते. तसेच, पसरट तोंडामुळे माठ आतून स्वच्छ करणे देखील सोपे जाते. माठ घेताना त्याचा तळ व्यवस्थित सपाट आहे का, हे देखील तपासावे जेणेकरून तो स्थिर राहील.

माठातील पाणी का फायदेशीर असते?

फ्रीजमधील पाणी प्यायल्याने अनेकदा घसा बसणे किंवा सर्दी होण्याचा त्रास होतो. याउलट, माती नैसर्गिकरित्या पाण्याचे तापमान नियंत्रित करते आणि ते पिण्यासाठी सुखद बनवते. तसेच मातीमधील गुणधर्मांमुळे पाण्याचा सामू (pH level) संतुलित राहण्यास मदत होते.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या