Digital Footprint: ज्यादिवशी तुम्ही स्मार्टफोन खरेदी कराल, त्या दिवसांपासून तुमची ऑनलाइन जगात नोंद होते, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. इंटरनेटवर आपण केलेली प्रत्येक सर्च, स्क्रोल आणि क्लिक वैयक्तिक डेटाची एक सतत वाढणारी खुण मागे सोडते. त्यामुळे कायमस्वरूपी ऑनलाइन जगातून बाहेर पडण्याचा विचार अनेकांच्या मनात येत असतो.
तुम्ही सहज सोप्या पद्धतीने तुमची ऑनलाइन माहिती डिलीट करू शकता. एकप्रकारे, इंटरनेटवरून गायब होऊ शकता.
ऑनलाइन उपस्थिती पुसून टाकण्याची प्रक्रिया सोप्या टप्प्यांमध्ये कशी पूर्ण करायची, ते जाणून घेऊया.
डिजिटल ठसा पुसण्यासाठी 5 सोप्या स्टेप्स
1. तुमच्या सर्व खुणा मिटवा (Erase Your Traces)
पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमच्या गुगल ॲक्टिव्हिटीचा डेटा डिलीट करा.. यासाठी युजर्सना myactivity.google.com वर जाऊन गुगल अकाउंटमध्ये साइन इन करावे लागेल. एकदा साइन इन केल्यावर तुम्हाला गुगल मॅप्सवरील सर्चपासून ते यूट्यूब व्हिडिओ आणि इमेज सर्चपर्यंत तुम्ही गुगल सेवांमध्ये केलेली प्रत्येक ॲक्शन दिसेल.
हा डेटा काढण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील ‘Delete activity by’ या पर्यायावर क्लिक करून ‘All Time’ निवडा. तुम्ही विशिष्ट तारखा किंवा गुगल उत्पादने निवडूनही डेटा कायमचा पुसून टाकू शकता. हा तुमच्या डिजिटल खुणा मिटवण्याचा पाया आहे.
2. अदृश्य व्हा (Go Invisible)
पूर्णपणे ‘गायब’ होण्यासाठी, तुम्ही तुमचा ब्राउझिंग आणि सर्च हिस्ट्री सेव्ह होणे थांबवले पाहिजे. यासाठी ‘Activity Control’ विभागात जा आणि ‘Web and App Activity’, ‘Location History’ आणि ‘YouTube History’ हे पर्याय बंद करा.
असे केल्याने गुगलला भविष्यात तुम्ही कोठे जाता, काय सर्च करता किंवा काय पाहता याचे निरीक्षण करता येणार नाही.
3. डेटा गोळा होण्यापासून थांबवा (Stay Private)
जुना डेटा साफ केल्यानंतर, नवीन डेटा गोळा होण्यापासून प्रभावीपणे रोखणे महत्त्वाचे आहे. यासाठी गुगल अकाउंट सेटिंग्जमधील ‘Data & Privacy’ विभागात जा आणि ॲक्टिव्हिटी ट्रॅकिंगचे सर्व पर्याय बंद करा. यामुळे तुमचा वेब आणि ॲप वापर, स्थान डेटा (Location Data) आणि यूट्यूब हिस्ट्री पार्श्वभूमीवर लॉग इन होणार नाही.
4. प्रायव्हसी ऑटोमॅटिक करा (Automate Privacy)
तुम्ही ऑटो-डिलीशन सेट करू शकता. myactivity.google.com/auto-delete येथे भेट देऊन ‘Web & App Activity’, ‘Timeline’ आणि ‘YouTube History’ यापैकी कोणतीही श्रेणी निवडा. त्यानंतर ‘Auto-delete’ पर्याय निवडून 3, 18 किंवा 36 महिन्यांपेक्षा जुनी ॲक्टिव्हिटी आपोआप हटवण्याचा पर्याय सेट करा. यामुळे तुमचे अकाउंट सतत स्वच्छ राहील.
5. कनेक्शन सुरक्षित करा (Secure Your Connection) तुमचे अकाउंट स्वच्छ असले तरी, तुमचे इंटरनेट कनेक्शन प्रायव्हेट (Private) असल्याशिवाय ते निरुपयोगी आहे. यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आणि प्रायव्हसी-केंद्रित ब्राउझर किंवा सर्च इंजिनचा वापर करा. तुम्ही डकडकगो, ब्रेव्ह सर्च किंवा स्टार्टपेजसारखे सर्च इंजिन वापरू शकता.
तसेच, टॉर ब्राउझर किंवा फायरफॉक्ससारखे (Firefox) प्रायव्हसी-केंद्रित ब्राउझर वापरणे योग्य आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक 3 ते 6 महिन्यांनी आपले पासवर्ड बदलणे हा हॅकर्सपासून बचाव करण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.









