Nano Banana AI Trend: AI प्लॅटफॉर्म्समध्ये सातत्याने बदल होत असून प्रत्येक अपडेटसोबत नवीन फीचर्स येत आहेत. हे नवीन अपडेट्स समोर येताच लगेचच ते सोशल मीडियावर ट्रेंड बनतात.
सध्या, 3D डिजिटल फिगरीन्सची एक नवीन क्रेझ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘नॅनो बनाना’ (Nano Banana) ट्रेंड ऑनलाइन धुमाकूळ घालत आहे. अनेकजण त्यांच्या फोटोचे 3डी मॉडेल शेअर करत आहेत. हा ट्रेंड नक्की काय आहे व तुम्ही तुमचा फोटो कशाप्रकारे 3D मॉडेलमध्ये रूपांतरित करू शकता, याविषयी जाणून घेऊया.
From photo to figurine style in just one prompt.
— Google Gemini App (@GeminiApp) September 1, 2025
People are having fun turning their photos into images of custom miniature figures, thanks to nano-banana in Gemini. Try a pic of yourself, a cool nature shot, a family photo, or a shot of your pup.
Here’s how to make your own 🧵 pic.twitter.com/e3s1jrlbdT
काय आहे ‘नॅनो बनाना’ ट्रेंड?
या व्हायरल 3D मॉडेल ट्रेंडच्या केंद्रस्थानी Google चे Gemini 2.5 Flash Image हे टूल आहे, ज्याला सोशल मीडियावर ‘नॅनो बनाना’ असे नाव मिळाले आहे. हे शक्तिशाली AI टूल कोणत्याही फोटोला काही सेकंदांतच जवळपास खऱ्या दिसणाऱ्या 3D मॉडेलमध्ये बदलू शकते.
हे टूल मोफत असले तरी, त्याचे रिझल्ट्स खूपच प्रभावी, शार्प आणि जिवंत दिसणारे असतात, ज्यात चेहऱ्यावरील हावभावापासून ते कपड्यांपर्यंत आणि पार्श्वभूमीतील घटकांपर्यंत सर्व गोष्टी अचूकपणे दिसतात.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतःची 3D फिगरीन सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर या ट्रेंडची सोशल मीडियावर चर्चा रंगली.
Cool pic.twitter.com/qquukf49RE
— Kyle Jollymore (@KyleJollymore89) September 2, 2025
असे तयार करा तुमचा 3D मॉडेल
जर तुम्हाला या व्हायरल 3D मॉडेल ट्रेंडमध्ये सामील व्हायचे असेल, तर तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो 3D मॉडेलमध्ये कसा कन्व्हर्ट करू शकता याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
Google AI Studio वेबसाइटवर जा: सर्वात आधी Google AI Studio वेबसाइटला भेट द्या.
‘Try Nano Banana’ शोधा: या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला Gemini 2.5 Flash Image टूलवर रीडायरेक्ट केले जाईल.
Custom Figurine तयार करा: तुमचा फोटो अपलोड करण्यासाठी ‘+’ बटणावर क्लिक करा किंवा फिगरीन तयार करण्यासाठी प्रॉम्प्ट द्या.
प्रॉम्प्टचा वापर करा: अधिक चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही खालीलप्रमाणे प्रॉम्प्ट वापरू शकता:
“A realistic 1/7 scale figurine of the pictured characters stands on a clear acrylic base atop a sleek wooden desk. The desk is tidy, with a monitor displaying the ZBrush sculpting process: showing wireframes, textures, and fine details. Beside it, a BANDAI-style toy box features vibrant 2D illustrations matching the figurine. Natural light from a nearby window casts soft shadows, highlighting the model’s textures and craftsmanship.”
डाउनलोड आणि शेअर करा: 3डी मॉडेल तयार झाल्यावर, ते डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
हे देखील वाचा –
अखेर iPhone 17 सिरीज लाँच! किती आहे भारतातील किंमत, काय आहे खास? जाणून घ्या सर्व माहिती