Jio Annual Recharge Plan : जर तुम्ही जिओचेसिम कार्ड वापरत असाल, तर कंपनी तुमच्यासाठी एक जबरदस्त प्लॅन देत आहे. जिओने त्यांच्या प्रीमियम वापरकर्त्यांसाठी असलेल्या ₹3,599 च्या वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये नुकतेच काही मोठे बदल केले असून, यात अनेक अतिरिक्त फायदे समाविष्ट केले आहेत.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना संपूर्ण 365 दिवसांची वैधता मिळते. सोबतच प्लॅनमध्ये डेटा, OTT (ओव्हर-द-टॉप) सेवा आणि AI (चा प्रीमियम ॲक्सेस पूर्णपणे मोफत दिला जात आहे. या प्लॅनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यात Google Gemini Pro चा 18 महिन्यांसाठी प्रीमियम ॲक्सेस मोफत मिळत आहे, ज्याची बाजारातील किंमत सुमारे 35,100 रुपये आहे.
डेटा आणि कॉलिंगचे फायदे
जिओच्या या वार्षिक प्लॅनमध्ये कंपनी एकूण 912.5 GB डेटा देत आहे.
- डेटा: याचा अर्थ तुम्हाला या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB हाय-स्पीड डेटा मिळतो.
- कॉलिंग आणि संदेश: यासोबत प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 संदेश करण्याची सुविधाही मिळते.
- 5G चा फायदा: 5G वापरकर्त्यांसाठी अमर्यादित 5G डेटाचा फायदा देखील उपलब्ध आहे. यासाठी तुमच्याकडे 5जी डिव्हाइस असणे आणि तुम्ही जिओच्या 5G नेटवर्क उपलब्ध असलेल्या ठिकाणी असणे आवश्यक आहे.
OTT आणि अन्य प्रीमियम फायदे
या प्लॅनमध्ये केवळ डेटाच नाही, तर अनेक प्रीमियम सेवांचे सबस्क्रिप्शन (Subscription) देखील मोफत मिळत आहे:
- JioHome: JioHome च्या नवीन जोडणीवर 2 महिन्यांचा मोफत ट्रायल (Trial).
- Google Gemini Pro: 18 महिन्यांसाठी Google Gemini Pro चा मोफत ॲक्सेस.
- JioHotstar: JioHotstar चे 3 महिन्यांसाठी मोबाईल/टीव्ही सबस्क्रिप्शन.
- JioAICloud: JioAICloud मध्ये 50 GB स्टोरेज (Storage).
हे देखील वाचा – Sanchar Saathi App : ‘संचार साथी’ ॲप काय आहे? जे सरकार स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल करण्यास सांगत आहे; जाणून घ्या









