Hyundai Venue N-Line: Hyundai (ह्युंदाई) कंपनीने आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV) Venue चे नवीन आणि अधिक स्पोर्टी मॉडेल Venue N-Line (वेन्यू एन-लाईन) भारतीय बाजारात सादर केले आहे. या नवीन एसयूव्हीची बुकिंग 25,000 रुपयांमध्ये सुरू झाली आहे.
कारचे अधिकृत लॉन्चिंग 4 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. जे ग्राहक वेन्यूसारख्या व्यावहारिक एसयूव्हीमध्ये स्पोर्टी, आकर्षक आणि दमदार ड्रायव्हिंगचा अनुभव घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हे नवीन मॉडेल खास तयार केले आहे.
डिझाइनमध्ये मोठे बदल:
Hyundai ने वेन्यू एन-लाईनला पूर्वीपेक्षा अधिक बोल्ड आणि डायनॅमिक लूक दिला आहे. यामध्ये एक्सक्लुझिव्ह डार्क क्रोम ग्रिल, रेड ॲक्सेंट्स आणि ड्युअल-टोन बॉडी ऑप्शन मिळतो. 17-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स, रेड ब्रेक कॅलिपर्स आणि ट्विन एग्जॉस्ट टिप्स, स्पोर्टी बंपर्स आणि मागील स्पॉयलर याला अधिक आकर्षक बनवतात. या बदलांमुळे वेन्यू एन-लाईन आता एखाद्या रॅली-रेडी एसयूव्हीसारखी दिसते.
केबिनमध्ये ‘रेस कार’चा अनुभव:
या एसयूव्हीच्या केबिनचे डिझाइन पूर्णपणे स्पोर्टी फिल देते. यामध्ये ब्लॅक-रेड थीमवर आधारित इंटिरियर, N-बॅज्ड लेदर सीट्स, मेटल पॅडल्स आणि N-लाईन स्टीयरिंग व्हीलसह एम्बिएंट लाइटिंग मिळते.
इंजिन आणि परफॉर्मेंस:
वेन्यू एन-लाईनमध्ये 1.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 118 bhp पॉवर आणि 172 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचे दोन ऑप्शन मिळतात, तसेच 7-स्पीड डीसीटी (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) चा पर्याय देखील उपलब्ध आहे. पॅडल शिफ्टर्स, मल्टी ड्राइव्ह मोड्स आणि ट्रॅक्शन कंट्रोल दिल्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद अनेक पटीने वाढतो. ट्विन एग्जॉस्ट सेटअपमधून येणारा स्पोर्टी आवाज याला आणखी रोमांचक बनवतो.
सेफ्टी फीचर्स – आता अधिक ॲडव्हान्स:
Hyundai ने वेन्यू एन-लाईनच्या सेफ्टीला उच्च प्राधान्य दिले आहे. ही एसयूव्ही आता लेवल-2 ADAS (21 फंक्शनसह) फीचरसह येते. यात इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ऑटो होल्ड, टीपीएमएस (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम) आणि 40 हून अधिक स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आहेत. त्यामुळे ही एसयूव्ही केवळ स्टायलिश नाही, तर सुरक्षित देखील आहे.
व्हेरियंट आणि कलर ऑप्शन:
वेन्यू एन-लाईन दोन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असेल: N6 (मॅन्युअल ट्रान्समिशन / डीसीटी) आणि N10 (डीसीटी). कलर ऑप्शनमध्ये ग्राहकांना 5 मोनोटोन कलर्स मिळतील. Hyundai ने N-लाईन सिरीजला i20 N-लाईन आणि क्रेटा N-लाईननंतर वेन्यू N-लाईनसह आता भारतीय बाजारपेठेत अधिक प्रीमियम बनवले आहे.
हे देखील वाचा – India vs South Africa Final : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलचे तिकीट कसे बुक कराल? किंमत 150 रुपयांपासून सुरू









