Home / लेख / सरकारी नोकरीची संधी; इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत बंपर भरती, 30,000 रुपये पगार

सरकारी नोकरीची संधी; इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत बंपर भरती, 30,000 रुपये पगार

IPPB GDS Executive Recruitment 2025: सरकारी बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB)...

By: Team Navakal
IPPB GDS Executive Recruitment 2025:

IPPB GDS Executive Recruitment 2025: सरकारी बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) ग्रामीण डाक सेवक (GDS) एक्झिक्युटिव्ह पदांसाठी बंपर भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 ऑक्टोंबरपासून सुरू झाली असून, उमेदवार 29 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

इच्छुक आणि पात्र उमेदवार IPPB च्या अधिकृत वेबसाइट ippbonline.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.

IPPB GDS Executive Recruitment 2025: पदाची माहिती आणि पगार

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30,000 रुपये इतका आकर्षक पगार मिळेल. ही भरती देशभरातील युवकांसाठी खुली आहे.

IPPB GDS Executive Recruitment 2025: शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

  • पात्रता: उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीअसणे आवश्यक आहे. तसेच, कॉम्प्युटरचे मूलभूत ज्ञानआणि डिजिटल बँकिंग प्रणालीची समज असणे गरजेचे आहे.
  • अनुभव: ग्रामीण डाक सेवक म्हणून अनुभव असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्राधान्यदिले जाईल.
  • वयोमर्यादा: अर्जदारांची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित वर्गासाठी सरकारी नियमांनुसार वयामध्ये सवलत मिळेल.

IPPB GDS Executive Recruitment 2025: निवड प्रक्रिया कशी असेल?

GDS एक्झिक्युटिव्ह पदासाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • ऑनलाईन परीक्षा (Online Exam)
  • कागदपत्र तपासणी (Document Verification)
  • मुलाखत (Interview)

या परीक्षेत बँकिंग आणि वित्तीय ज्ञान, कॉम्प्युटर जागरूकता आणि सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न विचारले जातील.

IPPB भरती 2025: अर्ज कसा करायचा?

  • सर्वात प्रथम ippbonline.com या IPPB च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • होमपेजवर “Career” सेक्शनमध्ये GDS Executive Recruitment 2025 या लिंकवर क्लिक करा.
  • “Apply Online” या पर्यायावर जाऊन तुमची नवीन प्रोफाईल तयार करा किंवा लॉगिन करा.
  • मागितलेली सर्व माहिती (नाव, जन्मदिनांक, शैक्षणिक योग्यता) अचूक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे, जसे की फोटो, स्वाक्षरी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन भरा.
  • सर्व माहिती तपासल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआऊट सुरक्षित ठेवा.

हे देखील वाचा – फक्त 12,499 रुपयात लाँच झाला Samsung Galaxy M17 5G स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या