Internet cable cut in red sea: लाल समुद्रातील (Red Sea) पाण्याखालील केबल खराब झाल्यामुळे भारत, पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतील काही भागांमध्ये इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या संकटामुळे जागतिक डिजिटल पायाभूत सुविधांची असुरक्षितता पुन्हा एकदा समोर आली आहे. कारण ही सुविधा समुद्राखालील केबल्सवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
रिपोर्टनुसार, याचा परिणाम केवळ दक्षिण आशियापुरता मर्यादित नव्हता. संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) युजर्सना देखील ऑनलाइन सेवा वापरण्यात अडचणी येत होत्या. सौदी अरेबियातील जेद्दाहजवळ असलेल्या केबल प्रणालीतील बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
या समस्येचे कारण अद्याप अज्ञात
सध्या समुद्राखालील केबल्सचे नुकसान कोणी केले किंवा कशामुळे झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा प्रकारचा बिघाड अनेकदा चुकून जहाजांचे अँकर अडकल्यामुळे, नैसर्गिक घटनांमुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या हल्ल्यांमुळे होतो. लाल समुद्राचा प्रदेश समुद्राखालील फायबर-ऑप्टिक केबल्ससाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे, ज्यातून जगभरात इंटरनेट सेवा पुरवली जाते.
मायक्रोसॉफ्टने दिला इशारा
जागतिक तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) ने देखील या घटनेमुळे त्यांच्या ‘अझूर’ (Azure) या क्लाउड कंप्युटिंग प्लॅटफॉर्मवर परिणाम झाल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने निवेदनात सांगितले की, लाल समुद्रातील अनेक समुद्राखालील फायबर केबल्स तुटल्यामुळे अझूर वापरणाऱ्या युजर्सना जास्त विलंब (जाणवू शकतो.
कंपनीने स्पष्ट केले आहे की, या प्रदेशातून जाणाऱ्या इंटरनेटवर परिणाम व होऊ शकतो, मात्र इतर जागतिक सेवांवर याचा परिणाम झालेला नाही.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
कर्करोगाच्या उपचारात क्रांती; रशियाने आणली नवीन ‘ही’ विशेष लस
ओबीसींच्या विरोधात जरांगेंच्या समर्थकाचा कोर्टात कॅव्हेट दाखल