Home / लेख / इस्रोच्या शास्त्रज्ञांनी टिपले इंटरस्टेलर धूमकेतू 3I/Atlas चे अचूक चित्र; माऊंट अबू येथील दुर्बिणीतून कॅमेऱ्यात केले कैद

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी टिपले इंटरस्टेलर धूमकेतू 3I/Atlas चे अचूक चित्र; माऊंट अबू येथील दुर्बिणीतून कॅमेऱ्यात केले कैद

Interstellar Comet 3I/ATLAS : भारतीय वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञांनी आंतरतारकीय (Interstellar) धूमकेतू 3I/ATLAS चे महत्त्वाचे निरीक्षण केले आहे. Physical Research Laboratory...

By: Team Navakal
Interstellar Comet 3I/ATLAS
Social + WhatsApp CTA

Interstellar Comet 3I/ATLAS : भारतीय वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञांनी आंतरतारकीय (Interstellar) धूमकेतू 3I/ATLAS चे महत्त्वाचे निरीक्षण केले आहे. Physical Research Laboratory (PRL) च्या शास्त्रज्ञांनी माऊंट अबू येथील त्यांच्या 1.2 मीटर दुर्बिणीचा वापर करून या दुर्मिळ धुमकेतूलचे निरिक्षण केले. हा धूमकेतू सूर्याजवळून प्रवास करून आता आतील सौरमालेपासून दूर जात आहे.

12 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान ही निरीक्षणे करण्यात आली, ज्यात धूमकेतूची रचना आणि रासायनिक घटक याबद्दल सविस्तर माहिती मिळाली. या निरीक्षणांमध्ये प्रतिमा (Imaging) आणि स्पेक्ट्रोस्कोपिक (Spectroscopic) पद्धतींचा समावेश होता.

केवळ तिसरा ज्ञात आंतरतारकीय धूमकेतू

3I/ATLAS हा आपल्या सौरमालेत प्रवेश करणारा तिसरा ज्ञात इंटरस्टेलर धूमकेतू आहे. तो जुलै 2025 मध्ये ATLAS सर्वेक्षणामुळे शोधला गेला. हा धूमकेतू एका हायपरबोलिक मार्गावरून प्रवास करत असल्याने तो दुसऱ्या तारकीय प्रणालीतून आला आहे आणि तो पुन्हा कधीही परतणार नाही. सुमारे 3,500 वर्षांपूर्वी तयार झालेल्या बर्फाचे कण आणि त्याच्या असामान्य रसायन रचनेमुळे शास्त्रज्ञ या धूमकेतूचा अभ्यास करत आहेत, कारण यातून आपल्या सूर्याबाहेर तयार झालेल्या पदार्थांची दुर्मीळ माहिती मिळू शकते.

धूमकेतूची रासायनिक रचना

दुर्बिणीच्या फोटोमध्ये खोट्या रंगांमध्ये दाखवलेला निकटवर्ती गोलाकार कोमा (Coma) दिसतो. कोमा म्हणजे धूमकेतूच्या केंद्रकाभोवती (Nucleus) जमा झालेल्या वायू आणि धुळीचे तेज. सूर्याच्या उष्णतेमुळे केंद्रकावरील गोठलेले बर्फाचे कण वितळतात, ज्यामुळे वायू आणि धूळ अवकाशात बाहेर पडते आणि कोमा तयार होतो.

PRL च्या चमूने पहाटेच्या आधी स्पेक्ट्रल डेटा मिळवला, ज्यात CN, C2 आणि C3 आण्विक बँड्स यांसारखी सौरमालेतील धूमकेतूंची वैशिष्ट्ये दिसली. या वायू उत्सर्जन वैशिष्ट्यांमुळेधूमकेतूची रासायनिक रचना ओळखण्यास मदत होते.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या