iPhone 16 वर बंपर डिस्काउंट, खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी; पाहा ऑफर

iPhone 16 Offers

iPhone 16 Offers | नवीन आयफोन 17 सीरिजच्या लाँचिंगपूर्वी सध्याच्या आयफोन मॉडेल्सला आकर्षक ऑफर्ससह खरेदी करण्याची आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये लाँच झालेला आयफोन 16 सध्या मोठ्या सवलतींसह (iPhone 16 Discount) आणि डील्ससह उपलब्ध आहे. जर तुम्हाला नवीन आयफोनला जास्त पैसे न देता घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone 16 वर मिळेल बंपर डिस्काउंट

आयफोन 16 चे 128GB वेरिएंट मॉडेल 79,999 रुपये किंमतीत लाँच झाले होते. आता या फोनवर कंपनी आकर्षक डिस्काउंट देत आहे. हा फोन फ्लिपकार्टवर 69,999 किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच थेट 10,000 रुपयांचीची सूट मिळेल.

याशिवाय, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा लाभ मिळाल्यास फोनची किंमत अजूनच कमी होती.

iPhone 16 चे फीचर्स

डिस्प्ले: ॲपल आयफोन 16 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2556×1179 पिक्सेल आणि 460 पीपीआयची पिक्सेल घनता आहे.

प्रोसेसर: यात ॲपलचा A18 बायोनिक चिप आहे, जो ॲडव्हान्स 3-नॅनोमीटर तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात ॲपल इंटेलिजन्ससारख्या सुधारित एआय फीचर्ससाठी 16-कोर न्यूरल इंजिनचा समावेश आहे.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यात 48MP मुख्य कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच सेल्फीसाठी 12MP ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा दिला आहे.

इतर वैशिष्ट्ये: यात ॲक्शन बटण देखील आहे आणि मॅगसेफ व Qi2 वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. हा फोन नवीनतम iOS 26 वर चालतो.

हे देखील वाचा –

LA28 Olympics Cricket: 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री, 6 संघ भिडणार; ‘या’ तारखेला रंगणार सामने

जयंत पाटील अखेर पायऊतार झालेच

अंतराळवीर शुभांशू शुक्ला सुखरूप परतले! भारताने इतिहास रचला! अभिमानाचा क्षण