Apple iPhone 16 Discount | ॲपल आयफोन 17 सीरिजच्या लॉन्चपूर्वी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने आयफोन 16 च्या किमतीत मोठी कपात केली आहे. आयफोन 16 चा (128GB, ब्लॅक) मॉडेल आता 69,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
ही किंमत मूळ लॉन्च किमतीपेक्षा (79,900 रुपये) थेट 9,901 रुपयांनी कमी आहे. सध्या ही सवलत केवळ 128GB स्टोरेज असलेल्या ब्लॅक रंगाच्या मॉडेलसाठीच उपलब्ध आहे.
फ्लिपकार्ट या फोनवर एक्सचेंज ऑफरचाही मोठा फायदा देत आहे, ज्यामध्ये तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 45,150 पर्यंत बचत करू शकता. मात्र, एक्सचेंजमध्ये मिळणारीऑफर तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीवर आणि तुमच्या ठिकाणावर अवलंबून असेल. बँक व एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास आयफोन 16 ला आणखी कमी किंमतीत खरेदी करता येईल.
आयफोन 16 ची प्रमुख वैशिष्ट्ये:
स्टँडर्ड आयफोन 16 मॉडेल ॲपलच्या 3nm A18 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो. हा फोन 128GB, 256GB आणि 512GB अशा तीन स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे.
डिस्प्ले: आयफोन 16 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 2,000 निट्सपर्यंत आहे. यात सिरामिक शील्ड प्रोटेक्शन आणि ॲपलचा डायनॅमिक आयलंड इंटरफेस देखील आहे.
प्रोसेसर आणि ऑपरेटिंग सिस्टम: फोनध्ये 3nm A18 ऑक्टा-कोर प्रोसेसर असून, हा फोन iOS 18 सह येतो.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी, आयफोन 16 मध्ये मागील बाजूस 48MP प्रायमरी लेन्स आणि 12MP अल्ट्रावाइड सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी समोर 12MP ट्रूडेप्थ कॅमेरा आहे. अल्ट्रावाइड लेन्स मॅक्रो फोटोग्राफीची क्षमता देखील सपोर्ट करते.
कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा: यात 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. या फोनला IP68 रेटिंग मिळाल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो.
आयफोन 17 सिरिज लॉन्च होण्यापूर्वी आयफोन 16 खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे.