iPhone 17 Sale: ॲपल कंपनीने नुकतीच iPhone 17 Series लाँच केली असून, या नवीन फोनची विक्री आजपासून (19 सप्टेंबर) सुरू झाली आहे. सर्वसाधारणपणे नवीन लाँच झालेल्या आयफोन मॉडेल्सवर फारसा डिस्काउंट मिळत नाही, पण या वेळी पहिल्याच सेलमध्ये iPhone 17 Series वर भरघोस सूट दिली जात आहे.
एकाच वेळी अनेक ऑफर्स असल्याने ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. तुम्ही देखील नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या ऑफर्सविषयी नक्की जाणून घेऊया.
iPhone 17 Sale: ॲपल कंपनीच्या ऑफर्स
ॲपलने प्रमुख बँकांसोबत सहा महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI चा पर्याय दिला आहे.
- American Express, Axis Bank, आणि ICICI Bank च्या कार्ड्सने पेमेंट केल्यास ग्राहकांना 10,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळेल.
- ‘Apple Trade In’ ऑफरमध्ये जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ग्राहकांना 64,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो. याचा फायदा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्टोअर्समध्ये घेता येईल आणि हा ऑफर EMI प्लॅनसोबतही वापरता येईल.
iPhone 17 Sale: अन्य रिटेलर्सच्या ऑफर्स
- ॲपलचे डिस्ट्रिब्युटर Ingram Micro हे सहा महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI वर iPhone 17 वर 6,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहेत. तसेच, दोन्ही प्रो मॉडेल्स आणि iPhone Air साठी 4,000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.
- फोन एक्सचेंज केल्यास ग्राहकांना 7,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळू शकतो.
- HDFC Bank, ICICI Bank, SBI Card आणि Bajaj Finance सोबत 24 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट EMI चा पर्यायही उपलब्ध आहे.
- ICICI Bank कार्ड धारकांसाठी 24 महिन्यांत डिव्हाइसच्या किंमतीच्या 75% रक्कम भरून बाकीची रक्कम नंतर देण्याचा किंवा बायबॅक गॅरंटीचा पर्यायही दिला आहे.
- Croma आणि Vijay Sales दोन्ही स्टोअर्सवर iPhone 17 (256 GB) वर 6,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, iPhone Air, iPhone 17 Pro आणि इतर मॉडेल्सवर 4,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.
- Reliance Digital सह इतर स्टोअर्समध्येही निवडक बँक ऑफर्स आणि एक्सचेंजवर अतिरिक्त सूट मिळत आहे.
iPhone 17 Series Price in India: सर्व व्हेरियंट्स आणि त्यांची भारतातील किंमत
iPhone 17
- iPhone 17 256GB – 82,900 रुपये
- iPhone 17 512GB – 1,02,900 रुपये
iPhone 17 Pro
- iPhone 17 Pro 256GB – 1,34,900 रुपये
- iPhone 17 Pro 512GB – 1,54,900 रुपये
- iPhone 17 Pro 1TB – 1,74,900 रुपये
iPhone 17 Pro Max
- iPhone 17 Pro Max 256GB – 1,49,900 रुपये
- iPhone 17 Pro Max 512GB – 1,69,900 रुपये
- iPhone 17 Pro Max 1TB – 1,89,900 रुपये
- iPhone 17 Pro Max 2TB – 2,29,900 रुपये
iPhone 17 Air
- iPhone 17 Air 256GB – 1,19,900 रुपये
- iPhone 17 Air 512GB – 1,39,900 रुपये
- iPhone 17 Air 1TB – 1,59,900 रुपये
हे देखील वाचा – Maharashtra Doctors Strike : सरकारचा ‘तो’ निर्णय ठरला वादग्रस्त, राज्यातील 1.8 लाख डॉक्टरांचा संप