Home / लेख / नवीन iPhone 17 खरेदीवर बंपर ऑफर्स; हजारो रुपयांची होईल बचत; आजच करा प्री-ऑर्डर

नवीन iPhone 17 खरेदीवर बंपर ऑफर्स; हजारो रुपयांची होईल बचत; आजच करा प्री-ऑर्डर

iPhone 17 Price in India: Apple ने आपल्या नवीन iPhone 17 सिरीजसाठी भारतात प्री-ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे. या सिरीजमध्ये...

By: Team Navakal
iPhone 17 Price in India

iPhone 17 Price in India: Apple ने आपल्या नवीन iPhone 17 सिरीजसाठी भारतात प्री-ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे. या सिरीजमध्ये iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max या मॉडेल्सचा समावेश आहे.

ग्राहक Apple च्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्स, तसेच अ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart), क्रोमा (Croma), रिलायन्स डिजिटल (Reliance Digital) आणि विजय सेल्स (Vijay Sales) सारख्या रिटेल पार्टनर्सकडे देखील प्री-ऑर्डर करू शकतात.

सर्व मॉडेल्सची डिलिव्हरी आणि ओपन सेल 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. या फोनवर तुम्हाला ऑफरचा देखील फायदा मिळेल.

iPhone 17 Price in India: प्री-ऑर्डर आणि ऑफर

Apple ने प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स देखील जाहीर केल्या आहेत:

  • बँक ऑफर: Axis Bank, ICICI Bank आणि American Express च्या निवडक कार्डवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे.
  • नो-इंटरेस्ट EMI: 6 महिन्यांपर्यंत नो-इंटरेस्ट EMI चा पर्यायही देण्यात आला आहे.
  • इतर फायदे: यामध्ये Apple Trade In सुविधा, तसेच Apple Music, Apple TV+ आणि Apple Arcade साठी तीन महिन्यांचा विनामूल्य सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.

iPhone 17 Price in India: किंमत

Apple च्या नवीन सिरीजमधील सर्व मॉडेल्स त्यांच्या स्टोरेज आणि रंग पर्यायांसह उपलब्ध आहेत:

  1. iPhone 17
  • 256GB: 82,900 रुपये
  • 512GB: 1,02,900 रुपये
  1. iPhone Air
  • 256GB: 1,19,900 रुपये
  • 512GB: 1,39,900 रुपये
  • 1TB: 1,59,900 रुपये
  1. iPhone 17 Pro
  • 256GB: 1,34,900 रुपये
  • 512GB: 1,54,900 रुपये
  • 1TB: 1,74,900 रुपये
  1. iPhone 17 Pro Max
  • 256GB: 1,49,900 रुपये
  • 512GB: 1,69,900 रुपये
  • 1TB: 1,89,900 रुपये
  • 2TB: 2,29,900 रुपये

iPhone 17 Series: स्पेसिफिकेशन्स

iPhone 17

  • डिस्प्ले: 6.3 इंच, Super Retina XDR, 3000nits पीक ब्राइटनेस
  • प्रोसेसर: A19
  • मागील कॅमेरा: 48MP Fusion मेन + 48MP Fusion Ultra Wide
  • पुढील कॅमेरा: 18MP Center Stage
  • बॅटरी: 30 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक
  • चार्जिंग: 40W अडॅप्टरसह 20 मिनिटांत 50 टक्के चार्ज
  • वॉटर रेझिस्टन्स: IP68

iPhone Air

  • डिस्प्ले: 6.5 इंच, Super Retina XDR, 3000nits पीक ब्राइटनेस
  • प्रोसेसर: A19 Pro
  • मागील कॅमेरा: 48MP Fusion
  • पुढील कॅमेरा: 18MP Center Stage
  • बॅटरी: 27 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक
  • चार्जिंग: 20W अडॅप्टरसह 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज
  • जाडी: 5.64mm
  • वॉटर रेझिस्टन्स: IP68

iPhone 17 Pro

  • डिस्प्ले: 6.3 इंच, Super Retina XDR, 3000nits पीक ब्राइटनेस
  • प्रोसेसर: A19 Pro
  • मागील कॅमेरा: 48MP Fusion मेन + 48MP Fusion Ultra Wide + 48MP Fusion Telephoto
  • पुढील कॅमेरा: 18MP Center Stage
  • बॅटरी: 31 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक
  • चार्जिंग: 30W अडॅप्टरसह 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज
  • वॉटर रेझिस्टन्स: IP68

iPhone 17 Pro Max

  • डिस्प्ले: 6.9 इंच, Super Retina XDR, 3000nits पीक ब्राइटनेस
  • प्रोसेसर: A19 Pro
  • मागील कॅमेरा: 48MP Fusion मेन + 48MP Fusion Ultra Wide + 48MP Fusion Telephoto
  • पुढील कॅमेरा: 18MP Center Stage
  • बॅटरी: 37 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक
  • चार्जिंग: 40W अडॅप्टरसह 20 मिनिटांत 50 टक्के चार्ज
  • वॉटर रेझिस्टन्स: IP68

हे देखील वाचा – लाखो रुपयांचा iPhone 17 आता दहा मिनिटांत तुमच्या हातात; ‘या’ कंपनीने ग्राहकांसाठी आणली खास ऑफर

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या