Home / लेख / जिओचा सुपर प्लॅन, कॉलिंग-डेटासह 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टार फ्री, पाहा किंमत

जिओचा सुपर प्लॅन, कॉलिंग-डेटासह 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टार फ्री, पाहा किंमत

Jio Rechare Plans | रिलायन्स जिओ (Jio) ही भारतातील सर्वात मोठी टेलिकन कंपनी असून, तिच्याकडे सध्या 4 कोटींपेक्षा अधिक ग्राहक...

By: Team Navakal

Jio Rechare Plans | रिलायन्स जिओ (Jio) ही भारतातील सर्वात मोठी टेलिकन कंपनी असून, तिच्याकडे सध्या 4 कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. कंपनीकडे अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि डेटासह येणारे अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्गेध आहेत. कंपनीच्या प्लॅन्समध्ये ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.

कंपनीने ग्राहकांसाठी असाच खास 84 दिवसांच्या वैधतेसह येणारा शानदार प्लॅन (Rechare Plans) आणला असून, यामध्ये 90 दिवसांसाठी JioHotstar Mobile चे सबस्क्रिप्शनही विनामूल्य दिले जाते. या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

1049 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन (Jio Rechare Plans)

जिओच्या 1049 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS मिळतात. याशिवाय, या प्लॅनमध्ये 50GB अतिरिक्त JioAI क्लाऊड स्टोरेज दिले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या प्लॅनमध्ये झी5 आणि सोनीलिव्हसह JioCinema आणि JioTV चाही मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.

तसेच, 90 दिवसांसाठी JioHotstar Mobile चे सबस्क्रिप्शनही विनामूल्य दिले जाते. मात्र नियमित डेटा समाप्त झाल्यास इंटरनेट 64 Kbps स्पीडने वापरू शकता.

जिओहॉटस्टारची ऑफर पूर्वी 31 मार्च 2025 पर्यंत होती, पण ती आता 15 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्वरित रिचार्ज करावे लागेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या