Jio 336 Days Recharge Plan: रिलायन्स जिओने (Reliance Jio) अशा ग्राहकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि किफायतशीर प्लॅन बाजारात आणला आहे, ज्यांना वर्षभर आपला नंबर ॲक्टिव्ह ठेवायचा आहे आणि ज्यांचा वापर फक्त कॉलिंग आणि SMS पुरता मर्यादित आहे. 500 रुपये (500 Rupees) पेक्षा कमी बजेटमध्ये जवळपास एक वर्षाची (336 Days) वैधता देणारा हा प्लॅन लाँग टर्म व्हॅल्यू प्लॅन म्हणून सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.
Jio 336 Days Recharge Plan: 895 रुपयांचा प्लॅन
या विशेष व्हॅल्यू प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण 336 दिवसांची वैधता मिळते, ज्यामुळे ग्राहकांना दर महिन्याला रिचार्ज करण्याची चिंता राहत नाही.
- किंमत: 895 रुपये
- वैधता : 336 दिवस (जवळपास 11 महिने)
- कॉलिंग: संपूर्ण वैधतेसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग
- SMS: संपूर्ण कालावधीसाठी 3600 SMS
- अतिरिक्त सुविधा: या प्लॅनसोबत तुम्हाला Jio TV आणि Jio AI Cloud चा एक्सेस मोफत मिळतो.
हा प्लॅन विशेषतः वृद्ध नागरिक किंवा केवळ सिम ॲक्टिव्ह ठेवून महत्त्वाचे कॉल्स आणि मेसेज स्वीकारणाऱ्या युजर्ससाठी डिझाइन केलेला आहे. लक्षात घ्या की हा प्लॅन केवळ केवळ जिओफोन युजर्ससाठी आहे.
84 दिवसांसाठीचा स्वस्त पर्याय
ज्यांना लाँग टर्मऐवजी कमी वैधतेचा स्वस्त प्लॅन हवा आहे, त्यांच्यासाठी जिओचा 448 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे.
- वैधता: 84 दिवस
- कॉलिंग आणि SMS: अनलिमिटेड कॉलिंग आणि 1000 SMS.
- अतिरिक्त सुविधा: यातही Jio TV आणि Jio AI Cloud चा एक्सेस मिळतो.
डेटा हवा असल्यास, 28 दिवसांचा स्वस्त प्लॅन
तुम्हाला कॉलिंग आणि SMS सोबत थोडा डेटा हवा असल्यास, जिओकडे एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.
189 रुपये प्लॅन: या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. यात तुम्हाला संपूर्ण वैधतेसाठी 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS मिळतात.
हे देखील वाचा – “आम्ही त्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही!” उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर फडणवीसांचे मदत देण्याबाबत सूचक विधान