Jio Postpaid Plan : जिओने (Jio) आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि स्वस्त फॅमिली पोस्टपेड प्लान आणला आहे. या प्लानची मासिक किंमत केवळ 449 रुपये आहे. या प्लानमुळे एकाच बिलावर चार सिमकार्ड (4 SIMs) वापरण्याची आणि प्रीमियम सबस्क्रिप्शनचा लाभ घेण्याची सुविधा मिळते.
5G वापरण्यास पात्र असलेल्या ग्राहकांना या प्लानसोबत अनलिमिटेड 5G डेटाही मिळणार आहे. हा प्लान एका कुटुंबासाठी हाय-स्पीड इंटरनेट आणि मनोरंजन एकाच वेळी पुरवतो.
जिओच्या 449 रुपये फॅमिली पोस्टपेड प्लानमधील सुविधा:
- मासिक डेटा: 75GB हाय-स्पीड डेटा मिळेल. हा डेटा संपल्यावर 10 रुपये प्रति GB शुल्क.
- कॉलिंग आणि SMS: अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा.
- फॅमिली सिम: मुख्य सिम व्यतिरिक्त तुम्ही 3 फॅमिली सिम जोडू शकता (एकूण 4 सिम).
- अतिरिक्त शुल्क: प्रत्येक अतिरिक्त सिमसाठी प्रति महिना 150 रुपये शुल्क आणि त्या सिमवर 5GB अतिरिक्त डेटा मिळतो.
प्लॅनसोबत मोफत मिळणारे प्रीमियम सबस्क्रिप्शन:
या प्लानमध्ये केवळ डेटा आणि कॉलिंग नाही, तर अनेक प्रीमियम OTT आणि इतर सुविधा मोफत मिळतात:
- JioHotstar: 3 महिन्यांचे मोबाईल/टीव्ही सबस्क्रिप्शन.
- JioSaavn Pro: 1 महिन्याचे मोफत सबस्क्रिप्शन.
- JioAICloud: 50GB (50 GB) मोफत स्टोरेज.
- इतर लाभ: Zomato Gold (3 महिने), Netmeds (6 महिन्यांची मेंबरशिप), EaseMyTrip कडून विमान तिकीट आणि हॉटेल बुकिंगवर आकर्षक सूट.
हे देखील वाचा – फोनचा चार्जर बनला महत्त्वाचा पुरावा! पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींच्या साथीदाराला ‘अशी’ झाली अटक