Home / लेख / Jio Plan : केबल टीव्ही आणि ओटीटीचे टेन्शन विसरा! Jio चा धमाका; एकाच प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime सह बरंच काही

Jio Plan : केबल टीव्ही आणि ओटीटीचे टेन्शन विसरा! Jio चा धमाका; एकाच प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime सह बरंच काही

Jio Plan : घरात वाय-फाय लावण्याचा विचार करत असाल आणि सोबतच टीव्ही चॅनल्स व ओटीटीसाठी वेगळा खर्च करायचा नसेल, तर...

By: Team Navakal
Jio Plan
Social + WhatsApp CTA

Jio Plan : घरात वाय-फाय लावण्याचा विचार करत असाल आणि सोबतच टीव्ही चॅनल्स व ओटीटीसाठी वेगळा खर्च करायचा नसेल, तर रिलायन्स जिओचा एक खास प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जिओ फायबर आणि एअर फायबर ग्राहकांसाठी कंपनीने 888 रुपयांचा एक असा प्लॅन आणला आहे, जो मनोरंजनाचे सर्व सोपस्कार एकाच रिचार्जमध्ये पूर्ण करतो.

डेटा आणि कॉलिंगची सुविधा

जिओच्या या 888 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 Mbps या वेगाने अनलिमिटेड डेटा मिळतो. इंटरनेटसोबतच यामध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. हा प्लॅन प्रामुख्याने त्या लोकांसाठी आहे ज्यांना हाय-स्पीडपेक्षा जास्त मनोरंजन आणि ओटीटी सुविधा हव्या आहेत.

टीव्ही चॅनल्स आणि ओटीटीचा खजिना

या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासोबत मिळणारे मोफत सबस्क्रिप्शन. यामध्ये केबल टीव्हीचे वेगळे कनेक्शन घेण्याची गरज उरत नाही, कारण जिओ 1000 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स ऑन-डिमांड उपलब्ध करून देते. याशिवाय खालील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मचा एक्सेस मिळतो:

  • नेटफ्लिक्स (बेसिक), अमेझॉन प्राइम लाईट आणि यूट्यूब प्रीमियम.
  • जिओ हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी5 आणि सन एनएक्सटी.
  • डिस्कव्हरी+, लायन्सगेट प्ले, शेमारूमी आणि ईटीव्ही विन यांसारखी 15 पेक्षा जास्त ॲप्स.

दीर्घकालीन फायद्यांची मेजवानी

हा प्लॅन 12 महिन्यांसाठी येतो. जर तुम्ही वर्षभरासाठी हा प्लॅन निवडला, तर कंपनीकडून 30 दिवसांची अतिरिक्त वैधता (व्हॅलिडिटी) मोफत दिली जाते. यामध्ये अमेझॉन प्राइम लाईटचे सबस्क्रिप्शन 2 वर्षांसाठी वैध असते. एअर फायबर युजर्सना दरमहा 1000GB पर्यंत हाय-स्पीड डेटा मिळतो, त्यानंतर इंटरनेटचा वेग 64Kbps होतो.

12 महिन्यांसाठी या प्लॅनची एकूण किंमत 10,656 रुपये इतकी होते, ज्यावर नियमानुसार जीएसटी अतिरिक्त आकारला जातो. दरमहा हिशोब केल्यास हा खर्च 888 रुपये येतो, जो मिळणाऱ्या फायद्यांच्या तुलनेत अतिशय परवडणारा आहे.

हे देखील वाचा – Heart Blockage Symptoms : हार्ट अटॅकचा धोका टाळायचा असेल तर ‘या’ 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वेळीच सावध व्हा!

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या