Netflix Free Subscription: भारतातील ओटीटी (OTT) सेवांमध्ये Netflix चे सब्स्क्रिप्शन सर्वात महागडे मानले जाते. मात्र, आता Jio (जिओ) आणि Airtel (एअरटेल) या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी असे आकर्षक प्लॅन आणले आहेत, ज्यात ग्राहकांना Netflix चा मोफत क्सेस मिळतो.
हे प्लॅन्स तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात, जर तुम्हाला Netflix मोफत वापरायचे असेल. एअरटेल आणि जिओच्या अशाच प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Netflix मोफत देणारे Jio आणि Airtel चे प्लॅन्स
Jio यूजर्ससाठी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह येणारे दोन पर्याय उपलब्ध आहेत, जे त्यांच्या डेटा आणि स्ट्रीमिंगच्या गरजेनुसार निवडले जाऊ शकतात. पहिला पर्याय म्हणजे 1,299 रुपयांचा प्लॅन. या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता, दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. याव्यतिरिक्त, 90 दिवसांसाठी JioHotstar चा अॅक्सेस आणि जिओ ॲप्सचा अॅक्सेस मिळतो.
दुसरा प्लॅन 1,799 रुपयांचा आहे, ज्यात यूजर्सला Netflix Basic सब्स्क्रिप्शन मिळते. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची असून यात दररोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.
Netflix Basic सब्स्क्रिप्शनमुळे ग्राहक मोबाईल व्यतिरिक्त स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉपवरही स्ट्रीमिंग करू शकतात. तसेच, या प्लॅनमध्ये JioTV आणि JioAICloud ॲप्सचा अॅक्सेस आणि 90 दिवसांसाठी JioHotstar चा अॅक्सेस दिला जातो.
एअरटेलचा 1798 रुपयांचा प्लॅन
दुसरीकडे, Airtel कडे एक असा प्लॅन आहे, ज्यात Netflix Basic सब्स्क्रिप्शन मोफत दिले जाते. या प्लॅनची किंमत 1,798 रुपये आहे.
या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता, दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. अतिरिक्त फायद्यांमध्ये Airtel Xstream चा अॅक्सेस, मोफत हेलूट्यून्स आणि Apollo 24/7 सुविधेचा समावेश आहे.
Netflix Mobile प्लॅनमुळे तुम्ही फक्त स्मार्टफोन आणि टॅबलेटवर स्ट्रीमिंग करू शकता, तर Netflix Basic प्लॅनमध्ये तुम्ही स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉपवरही (Laptop) स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
हे देखील वाचा – मंत्रालयात सल्लागारांच्या नावाखाली होणाऱ्या ‘लूटीला’ चाप! आयटी विभागातर्फे लवकरच विशेष पोर्टल