Home / लेख / Jio Recharge Plans : Jio ची ‘Happy New Year 2026’ ऑफर! जबरदस्त फायद्यांसह 3 नवीन स्वस्त प्लॅन लाँच

Jio Recharge Plans : Jio ची ‘Happy New Year 2026’ ऑफर! जबरदस्त फायद्यांसह 3 नवीन स्वस्त प्लॅन लाँच

Jio Recharge Plans : तुम्ही Jio चे सिम कार्ड वापरत असाल तर कंपनी तुमच्यासाठी नवीन वर्ष 2026 पूर्वी काही खास...

By: Team Navakal
Jio Recharge Plans
Social + WhatsApp CTA

Jio Recharge Plans : तुम्ही Jio चे सिम कार्ड वापरत असाल तर कंपनी तुमच्यासाठी नवीन वर्ष 2026 पूर्वी काही खास घेऊन आली आहे. Jio ने आपल्या तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सना ‘Happy New Year 2026’ या नावाने लाँच केले आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हे प्लॅन बाजारात आणले आहेत.

Jio Hero Annual Recharge Plan

ज्यांना वर्षभर तणावमुक्त राहायचे आहे, त्यांच्यासाठी Jio चा हा ‘हिरो अॅनुअल रिचार्ज प्लॅन’ खूप जबरदस्त ठरणार आहे.

  • किंमत: ₹3,599
  • वैधता: 365 दिवसांची वैधता
  • लाभ: दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा.
  • बोनस ऑफर: या रिचार्जमध्ये 18 महिन्यांसाठी Google Gemini Pro चे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळेल, ज्याची किंमत कंपनीनुसार ₹35,100 आहे.

Jio Super Celebration Monthly Plan

हा दुसरा प्रीपेड प्लॅन अशा युजर्ससाठी आहे, ज्यांना ओटीटी कंटेंट अधिक आवडतो.

  • किंमत: ₹500
  • वैधता: 28 दिवसांची वैधता
  • लाभ: दररोज 2GB डेटा, अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा.
  • OTT बंडल: या प्लॅनमध्ये YouTube Premium, JioHotstar, Amazon Prime Video, Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kancha Lanka, Planet Marathi, Chaupal, FanCode आणि Hoichoi सारख्या प्लॅटफॉर्म्सचा फ्री ॲक्सेस मिळत आहे.
  • बोनस ऑफर: या प्लॅनमध्येही 18 महिन्यांसाठी Google Gemini Pro चे सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे.

Jio Flexi Pack

कंपनीचा तिसरा प्लॅन कमी बजेट असलेल्या युजर्सना लक्षात घेऊन सादर केला गेला आहे.

  • प्रादेशिक पॅक: JioHotstar, Sun NXT, Kancha Lanka आणि Hoichoi चे सबस्क्रिप्शन.
  • किंमत: ₹103
  • वैधता: 28 दिवसांची वैधता
  • लाभ: 5GB डेटा मिळेल.
  • मनोरंजनपॅक: या प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक मनोरंजन पॅक निवडू शकता:
  • हिंदी पॅक: JioHotstar, ZEE5 आणि Sony LIV चे सबस्क्रिप्शन.
  • इंटरनॅशनल पॅक: JioHotstar, FanCode, Lionsgate आणि Discovery+ चा समावेश.

हे देखील वाचा – धमाकेदार डील! ₹10,000 पेक्षा कमी किमतीत मिळतोय Samsung चा स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या