Home / लेख / Jio OTT Plans : Netflix, Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन! जिओचे ‘हे’ स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन्स एकदा बघाच

Jio OTT Plans : Netflix, Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन! जिओचे ‘हे’ स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन्स एकदा बघाच

Jio OTT Plans : स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या गरजेमुळे आता हाय-स्पीड डेटा आणि OTT मनोरंजनाचे सबस्क्रिप्शन हे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरले...

By: Team Navakal
Jio OTT Plans
Social + WhatsApp CTA

Jio OTT Plans : स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या गरजेमुळे आता हाय-स्पीड डेटा आणि OTT मनोरंजनाचे सबस्क्रिप्शन हे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. या गरजेनुसार, जिओ (Jio) कंपनीने आकर्षक प्रीपेड डेटा प्लॅन बाजारात आणले आहेत, ज्यात Netflix, Prime Video, Sony Liv आणि JioHotstar यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व मोफत दिले जात आहे.

जिओचे डेटा प्लॅन ₹100 पासून सुरू होतात. तुमच्यासाठी OTT सबस्क्रिप्शनसह येणाऱ्या प्रमुख प्लॅन्सची माहिती दिली आहे:

₹1,799 चा सर्वात मोठा डेटा प्लॅन

हा प्लॅन Netflix सबस्क्रिप्शनसह येतो आणि यात सर्वाधिक डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. यात ग्राहकांना दररोज 3 GB डेटा मिळतो, तसेच अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS, आणि Jio TV व Jio AI Cloud चे सदस्यत्व समाविष्ट आहे.

₹445 चा सर्वाधिक OTT चा प्लॅन

हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध असून यात दररोज 2 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Sony Liv, Zee5, Lionsgate Play, Discovery+, FanCode सह तब्बल 10 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो. तसेच Jio TV आणि Jio AICloud चे मोफत सदस्यत्व यात समाविष्ट आहे.

₹1,029 चा Prime Video प्लॅन

या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग मिळते. यात ग्राहकांना Amazon Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. यासोबतच दररोज 100 SMS, Jio TV आणि Jio AI Cloud चे मोफत सदस्यत्व मिळते.

₹1,049 चा OTT प्लॅन

या प्लॅनची वैधता 84 दिवस असून, यात दररोज 2 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग मिळते. हा प्लॅन खास करून Sony Liv आणि Zee5 या दोन मोफत OTT सबस्क्रिप्शनसह येतो. यात Jio TV आणि Jio AI Cloud चे मोफत सदस्यत्व देखील उपलब्ध आहे.

₹195 चा स्वस्त JioHotstar प्लॅन

हा जिओचा एक परवडणारा आणि दीर्घकाळ चालणारा प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 90 दिवस आहे आणि यात एकूण 15 GB डेटा मिळतो. यात ग्राहकांना JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

हे देखील वाचा – CJI BR Gavai : सरन्यायाधीश गवई यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे वादंग; न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर येथे हिंदू समुदायाचे आंदोलन

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या