Jio Prepaid Plans Under 500: भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे (Reliance Jio Recharge plans) ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत. अगदी 200 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंतचे प्लॅन्स (Jio Prepaid Plans Under 500) कंपनीकडे आहेत.
जिओकडे असे काही रिचार्ज प्लान आहेत, जे निवडल्यास ग्राहकांना मोफत ओटीटी (OTT) सबस्क्रिप्शनचा फायदा मिळतो. जर तुम्हाला ओटीटी कंटेन्ट पाहण्यासाठी वेगळे पैसे खर्च करायचे नसतील, तर हे प्लान्स तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत.
बहुतेक प्लान्समध्ये तुम्हाला एक किंवा दोनच ओटीटी सेवा मोफत मिळतात. पण जिओच्या JioTV PREMIUM प्लान्समध्ये तुम्हाला 1-2 नव्हे तर तब्बल 10 ओटीटी ॲप्सचा कंटेन्ट पाहण्याचा पर्याय मिळतो आणि विशेष म्हणजे या प्लान्सची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे.
जिओचा 175 रुपयांचा ‘ऑल-इन-वन ओटीटी’ प्लान
- हा जिओचा एक ‘डेटा ओन्ली’ (Data Only) पॅक आहे.
- या प्लानमध्ये तुम्हाला 10 GB डेटा मिळतो, ज्याची वैधता 28 दिवसांची आहे.
- या पॅकमध्ये JioTV मोबाइल ॲपद्वारे Sony LIV, ZEE5, Liongate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, आणि Hoichoi अशा 9 OTT ॲप्सचा ॲक्सेस मिळतो.
जिओचा 445 रुपयांचा ‘ऑल-इन-वन ओटीटी’ प्लान
जर तुम्हाला दररोज डेटा हवा असेल, तर हा प्लान तुमच्यासाठी चांगला आहे.
- या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे आणि यात दररोज 2 GB डेटा मिळतो.
- यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसचा (SMS) पर्यायही मिळतो.
- या प्लानमध्ये Sony LIV, ZEE5, Liongate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, FanCode आणि Hoichoi अशा 10 OTT ॲप्सचा ॲक्सेस मिळतो.
- यासोबतच JioHotstar Mobile/TV चे सबस्क्रिप्शन 90 दिवसांसाठी मोफत मिळते. या प्लानमध्ये पात्र ग्राहकांना अमर्यादित 5G डेटाचा फायदाही दिला जात आहे.