Kia Car Price: तुम्ही नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने GST दरात केलेल्या बदलामुळे वाहन उत्पादक कंपनी Kia ने आपल्या विविध मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत.
या किमती 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. यामुळे ग्राहकांना लाखो रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे.
Kia Car Price: कोणत्या कारवर किती सूट?
Kia कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सर्व गाड्यांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. या कपातीचा सर्वाधिक फायदा Kia Carnival च्या खरेदीवर मिळत आहे.
- Kia Sonet च्या किमतीत सुमारे 1.65 लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे.
- Kia Syros च्या किमती 1.86 लाख रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत.
- Seltos च्या किमतीत 75,000 रुपयांची घट झाली आहे.
- Kia Carens च्या किमती 48,000 रुपयांनी, तर Kia Carens Clavis च्या किमती 78,000 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
- Kia Carnival वर सर्वाधिक 4.48 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.
GST दरातील बदलामुळे केवळ किआनेच नाही, तर Mercedes-Benz, Audi, Hyundai, Tata, Mahindra, Skoda, Toyota, Nissan, MG यांसारख्या इतर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनीही आपल्या गाड्यांच्या किमतींमध्ये बदल केला आहे. त्यामुळे 22 सप्टेंबरनंतर गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची हजोरा रुपयांची बचत होईल.
हे देखील वाचा –
‘Gen Z’ च्या आंदोलनानंतर नेपाळ सरकारचा मोठा निर्णय, सोशल मीडियावरील बंदी अखेर उठवली