Home / लेख / १० लाखांच्या आत आता ऑटोमॅटिक ‘Kia Sonet’!  नवीन व्हेरिएंट्ससह लाँच झाली खास कार; पाहा डिटेल्स

१० लाखांच्या आत आता ऑटोमॅटिक ‘Kia Sonet’!  नवीन व्हेरिएंट्ससह लाँच झाली खास कार; पाहा डिटेल्स

Kia Sonet : भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘किआ सोनेट’ने नुकताच ५ लाख युनिट्सच्या विक्रीचा विक्रमी टप्पा गाठला आहे....

By: Team Navakal
Kia Sonet
Social + WhatsApp CTA

Kia Sonet : भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘किआ सोनेट’ने नुकताच ५ लाख युनिट्सच्या विक्रीचा विक्रमी टप्पा गाठला आहे. आपल्या ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी किआ इंडियाने आता सोनेटचे नवीन स्वस्त ऑटोमॅटिक प्रकार बाजारात आणले आहेत. विशेष म्हणजे, आता १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही सोनेटचे ऑटोमॅटिक व्हेरियंट खरेदी करू शकता.

स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंट्सची एन्ट्री

शहरात राहणाऱ्या आणि रोजच्या प्रवासात सोयीस्कर गाडी शोधणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून कंपनीने हे नवीन पर्याय दिले आहेत. किआ सोनेट आता डीजल आणि टर्बो पेट्रोल अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये १० लाखांच्या आत ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवीन किमतींची माहिती (एक्स-शोरूम):

  1. डिझेल (१.५ लिटर): HTE(O) ६-स्पीड ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत ९.७८ लाख रुपयांपासून सुरू होते.
  2. टर्बो पेट्रोल (१.० लिटर): HTK(O) ७-स्पीड डीसीटी व्हेरिएंटची किंमत ९.९० लाख रुपयांपासून सुरू होते.

इंजिन आणि परफॉर्मन्सचे पर्याय

किआ सोनेटमध्ये ग्राहकांना दोन इंजिन पर्याय मिळतात:

  • डीझेल इंजिन: १.५ लिटर इंजिनसह ६-स्पीड टॉर्क कन्वर्टर ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
  • टर्बो पेट्रोल इंजिन: १.० लिटर टर्बो इंजिनसह ७-स्पीड डीसीटी ट्रान्समिशन दिले आहे.

बेस ऑटोमॅटिक व्हेरिएंट्स १० लाखांच्या आत उपलब्ध करून देऊन कंपनीने टाटा नेक्सॉन, मारुती सुझुकी ब्रेझा, ह्युंदाई वेन्यू आणि महिंद्रा ३एक्सओ सारख्या दिग्गज गाड्यांसोबतची स्पर्धा अधिक तीव्र केली आहे.

रंग आणि आकर्षक लूक

किआ सोनेट आता एका नवीन ‘मॅग्मा रेड’ रंगातही उपलब्ध झाली आहे. याव्यतिरिक्त कार इम्पीरियल ब्लू, प्यूटर ऑलिव, ग्लेशियर व्हाईट पर्ल, स्पार्किंग सिल्वर, अरोरा ब्लॅक पर्ल आणि ग्रेविटी ग्रे अशा अनेक आकर्षक रंगांत येते. कारच्या टॉप व्हेरिएंट्समध्ये ड्युअल टोन रंगांचाही पर्याय आहे.

कंपनीच्या या निर्णयामुळे आता बजेटमध्ये ऑटोमॅटिक गाडी घेणाऱ्या ग्राहकांना एक उत्तम आणि प्रीमियम पर्याय उपलब्ध झाला आहे. तुमच्या जवळच्या किआ शोरूमला भेट देऊन तुम्ही या नवीन व्हेरियंट्सची टेस्ट राईड घेऊ शकता.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या