Home / लेख / Kidney Damage Symptoms : किडनी शरीराचा ‘सायलेंट किलर’! आधीच ओळखा ‘ही’ लक्षणं; नाहीतर वाढू शकतो धोका

Kidney Damage Symptoms : किडनी शरीराचा ‘सायलेंट किलर’! आधीच ओळखा ‘ही’ लक्षणं; नाहीतर वाढू शकतो धोका

Kidney Damage Symptoms : किडनी (Kidney) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा फिल्टरिंग युनिट आहे, जो रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी...

By: Team Navakal
Kidney Damage Symptoms
Social + WhatsApp CTA

Kidney Damage Symptoms : किडनी (Kidney) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा फिल्टरिंग युनिट आहे, जो रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतो. किडनीचे कार्य बिघडल्यास, शरीरातील विषारी घटक जमा होऊ लागतात, ज्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

किडनीचे आजार अनेकदा सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाहीत, पण किडनी निकामीहोण्यापूर्वी शरीर काही स्पष्ट 10 संकेत देते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे खूप धोकादायक ठरू शकते.

ज्यांच्या कुटुंबात किडनीच्या आजाराचा इतिहास आहे किंवा ज्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे, अशा लोकांनी ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किडनी खराब होण्याची ‘ही’ आहेत 10 प्रमुख लक्षणे:

पाठ आणि बरगड्यांमधील वेदना: बरगड्या (Ribs) आणि हिप्स (Hips) यांच्या मधल्या भागात किंवा पाठीच्या खालच्या भागात सतत वेदना जाणवणे.

थकवा आणि अशक्तपणा: अचानक आणि दीर्घकाळ टिकणारा थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, तसेच चालताना किंवा झोपताना त्रास होणे.

शरीरात सूज: किडनीची फिल्टर करण्याची क्षमता कमी झाल्यावर शरीरात अतिरिक्त द्रव जमा होतात. यामुळे पाय, घोटे (Ankles) आणि तळपायावर सूज (Edema) येणे.

यूरिनच्या सवयीत बदल: यूरिन (Urine) कमी होणे किंवा जास्त होणे, तसेच रात्रीच्या वेळी वारंवार यूरिनला जावे लागणे हे किडनी डॅमेजचे प्रारंभिक संकेत असू शकतात.

त्वचा आणि खाज: किडनीचे कार्य बिघडल्यास त्वचा खूप कोरडी होते, त्वचेवर खाज सुटते किंवा पुरळ येते.

डोळ्यांभोवती सूज: किडनीच्या आजारात अनेकदा डोळ्यांभोवती लालसरपणा किंवा सूज दिसून येते.

यूरिनचा प्रकार बदलणे: यूरिनमध्ये फेस (Foam) किंवा बुडबुडे दिसणे, यूरिनचा रंग गडद होणे किंवा यूरिनमधून रक्त येणे हे गंभीर धोक्याचे संकेत आहेत.

सतत उच्च रक्तदाब: रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित न राहता तो सतत जास्त राहणे.

मांसपेशींमध्ये वेदना आणि गोळे: स्नायूंमध्ये गोळे येणे किंवा तीव्र वेदना जाणवणे.

भूक न लागणे आणि मळमळ: भूक न लागणे तसेच मळमळ आणि उलट्या होणे.

हे देखील वाचा – भारताच्या विजयानंतर ICC चा मोठा निर्णय! पुढील महिला विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये केला मोठा बदल

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या