Lava Blaze AMOLED 2 5G Details: भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावाने (Lava) आपला आणखी एक बजेट फोन लाँच केला आहे. कंपनीने यावेळी Lava Blaze AMOLED 2 5G या नावाने हा नवीन फोन सादर केला आहे. या शानदार स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 7060 चिपसेट आहे आणि.
या डिवाइसमध्ये 6.67-इंचचा AMOLED डिस्प्लेदेण्यात आला असून, यात 6GB रॅम मिळते. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 33W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. चला, या फोनची किंमत आणि खास फीचर्स जाणून घेऊया.
Lava Blaze AMOLED 2 5G ची किंमत
या डिवाइसची सुरुवातीची किंमत 13,499 रुपये आहे, ज्यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन ‘फेदर व्हाइट’आणि ‘मिडनाइट ब्लॅक’ या दोन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची विक्री 16 ऑगस्टपासून Amazon वर सुरू होईल.
Lava Blaze AMOLED 2 5G चे स्पेसिफिकेशन्स
- हा फोन अँड्रॉइड 15 वर चालतो आणि लवकरच त्याला अँड्रॉइड 16 चे अपडेटही मिळेल.
- यात 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67-इंचचा फुल-एचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळतो.
- परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक 7060 चिपसेट आणि 6GB LPDDR5 रॅम देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी, यात सोनी IMX752 सह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. - सेल्फीसाठी समोर 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
- सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
- फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सुविधाही मिळते.