Lava Bold 2 5G : भारतीय स्मार्टफोन कंपनी लाव्हाने आपल्या ‘बोल्ड’ सीरिजचा विस्तार करत नवीन ‘Lava Bold 2 5G’ भारतात सादर केला आहे. एप्रिल २०२५ मध्ये लाँच झालेल्या मागील मॉडेलची जागा आता हा नवीन फोन घेणार आहे. आकर्षक लूक, शक्तिशाली प्रोसेसर आणि ब्लोटवेअर-मुक्त अनुभवामुळे हा फोन बजेट सेगमेंटमध्ये एक तगडा स्पर्धक ठरणार आहे.
Lava Bold 2 5G : किंमत
या नवीन स्मार्टफोनची किंमत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटसाठी १२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ग्राहकांसाठी २ रंगांत उपलब्ध असेल:
- फदर व्हाईट
- मिडनाईट ब्लॅक
हा फोन १९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता ॲमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, कंपनीने ग्राहकांसाठी ‘फ्री डोअरस्टेप सर्व्हिस’ देण्याचेही आश्वासन दिले आहे.
Lava Bold 2 5G : प्रमुख वैशिष्ट्ये
- डिस्प्ले: यात ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस अॅमोलेड डिस्प्ले दिला असून १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटमुळे यूजर्स अत्यंत स्मूथ अनुभव मिळेल.
- प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ७०६० चिपसेटवर चालतो. अँटुटू बेंचमार्क टेस्टमध्ये या फोनने ५ लाखांहून अधिक स्कोअर मिळवला आहे. तसेच यात ६ जीबी एलपीडीडीआर५ रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे.
- कॅमेरा सेटअप: मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर असलेला मुख्य कॅमेरा आहे. सेल्फीसाठी समोरच्या बाजूला ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग: ५००० एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी आणि ३३ वॉट फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.
- सॉफ्टवेअर आणि सुरक्षा: हा फोन थेट अँड्रॉइड १५ वर आधारित असून, युजर्सना कोणत्याही जाहिरातींशिवाय (ॲड-फ्री) अनुभव मिळेल. सुरक्षिततेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि धूळ-पाण्यापासून बचावासाठी आयपी६४ रेटिंग देण्यात आली आहे.
मिडनाईट ब्लॅक आणि फदर व्हाईट अशा दोन रंगांत सादर झालेला हा स्मार्टफोन त्याच्या ७.५५ मिमीच्या स्लिम डिझाइनमुळे हाताळायला अत्यंत सोयीस्कर आहे.











