स्वस्त आणि मस्त! फक्त 9,999 रुपयात ब्रँडेड लॅपटॉप खरेदीची संधी, पाहा डिटेल्स

Lenovo 100e Chromebook offer

Lenovo 100e Chromebook offer | लॅपटॉप खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते, असे अनेकांना वाटते. मात्र, अनेक कंपन्या आता कमी बजेटमध्ये चांगले लॅपटॉप लाँच करत आहे. तुम्हाला कॉम्पॅक्ट साईजचा ब्रँडेड लॅपटॉप (branded laptop) आता केवळ 9,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) ही खास ऑफर Lenovo 100e Chromebook वर उपलब्ध आहे.

इंटरनेट ब्राउझिंग पासून ते बेसिक नोट्स घेण्यापर्यंत आणि टेक्स्ट फॉरमॅटिंगसारखीकामे आता युजर्स क्रोमबुकच्या (Chromebook) मदतीने सहजपणे करू शकतात. लेनोव्होचा (Lenovo) क्रोमबुक खास सवलतीनंतर 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येऊ शकतो आणि यावर अतिरिक्त ऑफर्सचा (additional offers) फायदा दिला जात आहे. Lenovo 100e Chromebook वरी ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

या ऑफर्ससोबत खरेदी करा क्रोमबुक

लेनोव्होचा हा डिवाइस खास डिस्काउंटनंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर फक्त 9,999 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. यासाठी Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने (credit card) पेमेंट केल्यास 5 टक्के कॅशबॅक (cashback) दिला जात आहे. याव्यतिरिक्त, Axis Bank कार्ड्सने पेमेंट केल्यास 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.

इतर निवडक बँक कार्ड्सने पेमेंट केल्यास देखील 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. ग्राहकांना ईएमआय व्यवहारांवर वेगळी सूट दिली जात आहे.

Lenovo 100e Chromebook चे स्पेसिफिकेशन्स

लेनोव्हो लॅपटॉपमध्ये 11.6 इंचचा HD (1366×768) TN डिस्प्ले आहे, जो अँटी-ग्लेअर फिनिशसह (anti-glare finish) येतो, ज्यामुळे जास्त वेळ अभ्यास किंवा ब्राउझिंग करताना डोळ्यांवर कमी ताण येतो. MediaTek Kompanio 520 प्रोसेसरसोबत यात 4GB पर्यंत RAM आणि 32GB eMMC स्टोरेज मिळते. या क्रोमबुकमध्ये Chrome OS प्री-इंस्टॉल्ड येते, जे जलद बूट टाइम आणि Google Workspace टूल्ससोबत इंटिग्रेशन (integration) ऑफर करते.

कनेक्टिव्हिटीसाठी यात दोन USB Type-A पोर्ट, एक USB Type-C पोर्ट (पॉवर डिलिव्हरी आणि डिस्प्ले आउटपुटसह), HDMI पोर्ट आणि एक हेडफोन/मायक्रोफोन कॉम्बो जॅक समाविष्ट आहेत. डिवाइसचे वजन सुमारे 1.25 किलोग्राम आहे, जे याला पोर्टेबल बनवते आणि याची बॅटरी 42Wh ची आहे, जी सामान्य वापरामध्ये सुमारे 10 तासांपर्यंत चालू शकते.